Indian Idol 12 winner Pawandeep Rajan Car accident both leg fracture ; Indian Idol 12 चा विजेता पवनदीप राजनचा भीषण अपघात, रुग्णालयात दाखल, तब्बेत नाजूक… – Pressalert

0


टीव्ही शो इंडियन आयडल 12 चा विजेता गायक पवनदीप राजन उत्तराखंडहून नोएडाला जात असताना झालेल्या अपघातात जखमी झाला. गजरौला येथे महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या कॅन्टरला त्याची कार धडकली. या अपघातात त्यांचा चालक राहुल सिंग आणि साथीदार अजय मेहरा हेही जखमी झाले. पोलिसांनी तिघांनाही खाजगी रुग्णालयात दाखल केले.

गायक पवनदीपची प्रकृती अजूनही गंभीर आहे. पोलिसांनी दोन्ही नुकसानग्रस्त वाहने ताब्यात घेतली आहेत. उत्तराखंडमधील चंपावत येथील रहिवासी सुरेश राजन यांचा मुलगा पवनदीप हा भारतीय गायन रिअॅलिटी टीव्ही शो इंडियन आयडल १२ चा विजेता आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री पवनदीप त्याचा मित्र अजय मेहरासोबत घरून नोएडाला जात होता, तेव्हा हा अपघात झाल्याच सांगण्यात येत आहे. 

(हे पण वाचा -Indian Idol 12 चा विजेता पवनदीप राजनचा भीषण अपघात, रुग्णालयात दाखल, तब्बेत नाजूक…) 

यावेळी त्यांची गाडी चालक राहुल सिंग चालवत होता. रात्री अडीचच्या सुमारास गजरौला पोलिस स्टेशन परिसरातील चौपाला क्रॉसिंग ओव्हरब्रिजवरून त्यांची कार खाली येताच, मागून महामार्गाच्या बाजूला उभ्या असलेल्या कॅन्टरला धडकली. चालक राहुल सिंग झोपी गेल्यामुळे हा अपघात झाला. या अपघातात गायक पवनदीप, त्याचा साथीदार अजय मेहरा आणि चालक राहुल सिंग गंभीर जखमी झाले.

(हे पण पाहा – Pawandeep Accident : पवनदीप राजनच्या अपघातानंतर पहिला व्हिडीओ आला समोर ) 

अपघातानंतर लोकांची गर्दी जमली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना गाडीतून बाहेर काढले आणि सरकारी रुग्णालयात दाखल केले. तेथून डॉक्टरांनी तिघांनाही मुरादाबादला रेफर केले. तिघांचीही गंभीर प्रकृती पाहून पोलिसांनी त्यांना दिदौली येथील महामार्गावर असलेल्या एका खाजगी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल केले.

माहिती मिळताच गायक पवनदीपचे कुटुंबीय रुग्णालयात पोहोचले. येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर, तिघांनाही चांगल्या उपचारांसाठी नोएडा येथे नेण्यात आले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, पवनदीपचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले आहेत आणि त्याच्या डोक्यालाही दुखापत झाली आहे.

सीओ श्वेताभ भास्कर म्हणाले की, दोन्ही नुकसानग्रस्त वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत. तक्रारीच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल. कार चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाला.




LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here