महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे युती करणार असल्याची चर्चा सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. राज ठाकरे एका मुलाखतीत बोलताना म्हणाले होते, महाराष्ट्राचे कल्याण होणार असेल तर कौटुंबिक भांडणासारख्या क्
.
छगन भुजबळ म्हणाले, मी बाळासाहेबांसोबत जवळून काम केले आहे. राज ठाकरे वेगळे होत आहेत, हे कळल्यावर मी 12 वर्षे शिवसेना सोडली, पण कोणाशी बोललो नाही. हे कळल्यावर मी स्वतः राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना फोन केला. मी त्यांना आठ दिवस शांत राहण्यास सांगितले. ते शांत राहिले, पण दुर्दैवाने जे व्हायचे ते झाले. त्यामुळे जर आता ते दोघे एकत्र आले, तर मला खूप आनंद होईल. माझा पक्ष वेगळा आहे. मी बाळासाहेबांच्या काळातच बाहेर पडलो. पण आमचे शिवसेनेबद्दलचे प्रेम कमी झालेले नाही. सर्व कुटुंब एकत्र आले, तर खूप चांगले होईल.
महाराष्ट्रात मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र आले तर याचा परिणाम काय होईल, असा प्रश्न विचारला असता छगन भुजबळ म्हणाले, निश्चितपणे याचा परिणाम होईल. शिवसेनेची ताकद वाढेल. दोन कार्यकर्ते एकत्र आले, तरी ताकद वाढल्यासारखे वाटते. हे तर मोठे नेते आहेत. एखादा पडलेला आमदार जरी पक्षात आला, तरी ताकद वाढते, असे भुजबळ यांनी उत्तर दिले आहे.
पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले, कार्यकर्त्यांची इच्छा असते आणि ते थेट बोलू शकत नाहीत, म्हणून प्रेमापोटी बॅनर लावतात. त्याचा फारसा परिणाम होत नाही. तुमच्याकडे बातम्या सुरू झाल्या की परिणाम होतो, हे खरे आहे. तसेच माझे आयुष्य अजित पवारांवर सोपवले आहे कार्यकर्ते कधी कधी बॅनर लावतात, असेही भुजबळ यावेळी म्हणाले आहेत.
दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल काही सांगता येत नाही, असे वातावरण निर्माण झाले आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकतर यावेत अशी अनेकांची इच्छा आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने बघायचे झाले तर, उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे यांचा फायदा होऊ शकतो. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे यांची उपयुक्तता सर्वांनाच वाटते, असे छगन भुजबळ म्हणाले होते.