Shah Rukh Khan Routine at Home : बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या किंग या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत त्याची लेक सुहाना खान देखील दिसणार आहे. या चित्रपटाला घेऊन सगळे खूप उत्सुक आहेत. सध्या या चित्रपटाची शूटिंग सुरू आहे आणि रिलीजसाठी अजून थोडा वेळ लागणार आहे.
शाहरुख हा असाच एक स्टार आहे जो कायमच नेहमीच चर्चेत असतो. मग त्याचं खासगी आयुष्य असो किंवा मग त्याचं काम तो सतत चर्चेत असतो. पण जेव्हा तो कॅमेऱ्यापासून दूर असतो तेव्हा तो घरी काय करत असेल असा प्रश्न अनेकांना पडतो? याचं उत्तर शाहरुख खाननं अलीकडेच मुंबईत ‘WAVES 205’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. तेव्हा करण जोहरनं शाहरुखला विचारलं की, ‘जेव्हा काही काम नसतं, शूटिंग नाही, तेव्हा तू काय करतोस?’
शाहरुख हसत म्हणाला, ‘मी काहीच करत नाही. माझ्या वडिलांनी मला शिकवलं होतं. जे काही करत नाहीत, तेच काहीतरी कमाल करतात.’ शाहरुखनं अगदी साधेपणाने सांगितलं की त्याला मोकळा वेळ फक्त निवांत बसून घालवायला आवडतो. त्याला काहीच न करता घरात शांत बसणं आवडतं आणि तो यामुळे त्रासून जात नाही.
त्यानं पुढे सांगितलं की ‘गौरी म्हणाली की, रूम साफ कर, तर मी करतो. मुलगा म्हणतो की, वह्यांवर कव्हर लाव किंवा आयपॅड अपडेट कर, तर तेही करतो.’ या छोट्या-छोट्या गोष्टींमुळे तो आपल्या कुटुंबाच्या अधिक जवळ राहतो असं त्याचं मत आहे.
शाहरुख पुढे म्हणतो की, ‘आपल्याला खूप जास्त विचार करणं आणि सतत धावपळ करणं टाळायला हवं.’ जेव्हा काम नसतं, तेव्हा तो पूर्णपणे घरच्या वातावरणात गुंतलेला असतो. मुलांसोबत वेळ घालवणं, मित्रांसोबत गप्पा मारणं किंवा अगदी काही न करता शांत बसणं. हेच त्याला खऱ्या अर्थाने समाधान देतं.
हेही वाचा : 500 चित्रपटांमध्ये केलं काम; आता कुठे गायब झाली ‘ही’ बॉलिवूडची लोकप्रिय खलनायिका?
दरम्यान, शाहरुख खान सगळ्यात शेवटी 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पठाण’, ‘जवान’ आणि ‘डंकी’ या सुपरहिट चित्रपटांमध्ये झळकला होता.