between war like situation india played match againts pakistan in asian beach handball championship | युद्धजन्य परिस्थितीत शुक्रवारी भारत

0

[ad_1]

IND VS PAK : भारत आणि पाकिस्तानमध्ये (India VS Pakistan) सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे. पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने भारताच्या महत्वाच्या शहरांवर हल्ल्याचा प्रयत्न केला परंतु ते हल्ले भारताने परतवून लावले. या हल्ल्यानंतर भारताने सुद्धा प्रतिउत्तर देत पाकिस्तानवर हल्ल्याचा प्रयत्न केला.  सध्या दोन्ही देशांमधील स्थिती अत्यंत तणावपूर्वक आहे. अशा परिस्थितीत ओमानची राजधानी मस्कतमध्ये भारत पाकिस्तान संघात शुक्रवारी हँडबॉल सामना खेळवला गेला. ओमानमध्ये 10 वी आशियायी बीच हॅन्डबॉल चॅम्पियनशिप (Asian Beach Handball Championship) पार पडली. भारतीय खेळाडू या सामन्यादरम्यान काळी पट्टी बांधून मैदानात उतरले होते. 

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार आशियायी बीच हॅन्डबॉल चॅम्पियनशिप दरम्यान शुक्रवारी भारत पाकिस्तान च्या संघांमध्ये सामना खेळवला गेला. यावेळी भारतीय खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात उतरले. मात्र स्पर्धेच्या आयोजकांनी आणि आशियायी हॅन्डबॉल महासंघाने यावर आक्षेप घेतला आणि काळ्या पट्ट्या काढायला सांगितल्या. आयोजकांनी भारतीय कोचिंग स्टाफला सांगितले की स्पर्धेदरम्यान भारतीय संघाने अशा प्रकारचे निषेध केला तर त्यांच्या संघाला टूर्नामेंटमधून बाहेर केले जाईल. 

हेही वाचा : रोहित पाठोपाठ विराट कोहलीही निवृत्तीच्या तयारीत; मात्र BCCI कडूनच होतोय विरोध

 

भारतीय खेळाडू टाकणार होते बहिष्कार : 

भारतीय खेळाडूंनी यापूर्वी स्थानिक पातळीवर जनतेच्या नाराजीच्या भीतीने सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा विचार केला होता. परंतु आशियायी हॅन्डबॉल महासंघाने त्यांच्यावर बंदी आणि दंड लावण्याचा इशारा दिला. त्यानंतर त्यांनी सामना खेळण्याचा निर्णय घेतला. हॅन्डबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे कार्यकारी निदेशक आनंदेश्वर पांडेने सांगितले की, ‘आंतरराष्ट्रीय हॅन्डबॉल महासंघानुसार जर भारतीय संघाने सामन्यावर बहिष्कार केला असता तर संघाला 10000 डॉलरचा दंड भरावा लागला असता. तसेच भारतीय संघाला हॅन्डबॉलच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून दोन वर्षांची बंदी देखील लागू शकली असती. आयएचएफने आम्हाला स्पष्टपणे सांगितले की जर भारतीय संघ सामन्यासाठी आला नाही तर ते ऑलिंपिक चार्टरच्या भावनेविरुद्ध मानले जाईल. आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता, म्हणून आम्हाला शुक्रवारी पाकिस्तान विरुद्ध लीग स्टेज सामना खेळावा लागला. शुक्रवारी झालेल्या सामन्यात भारतीय संघाचा पाकिस्तान विरुद्ध 0-2  ने पराभव झाला. या स्पर्धेचा फायनल सामना हा 15 मे रोजी होणार आहे. 

 



[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here