टाऊनशिप येथे ब्लॅक बेल्ट,डिग्री अवॉर्ड, कराटे बेल्ट सर्टिफिकेट वाटप

0

उरण दि २५(विठ्ठल ममताबादे) : शोतोकोन कराटे टू स्पोर्ट्स असोशिएशन (एस के एस ए,) यांच्या मान्यतेने जेएनपीटी टाऊनशिप येथे ब्लॅक बेल्ट,डिग्री सर्टिफिकेट अवॉर्ड, तसेच कराटे बेल्ट एक्झाम सर्टिफिकेट वाटप करण्यात आले.दिनांक २४ जून २०२५ रोजी जेएनपीटी टाऊनशिप येथे ब्लॅक बेल्ट डिग्री सर्टिफिकेट वाटप करण्यात आले. S K S A महाराष्ट्र प्रेसिडेंट विकास भोईर व  दीपक घरत यांना फोर्थ डिग्री ब्लॅक बेल्ट (Yondan) देऊन गौरवण्यात आले.

तसेच अजय तांडेल,प्रगती घरत, सोनल तांडेल, मिलन जाधव व किरण हर्गीवाड यांना सेकंड डिग्री ब्लॅक बेल्ट(nidan ) देऊन व अथर्व कडू,साईराज कडू, आशीर्वाद सिंग, ओंकार माने, सचिन गावंड,यांना फर्स्ट डिग्री ब्लॅक बेल्ट (shodan)देऊन गौरवण्यात आले. तसेच एकूण ६६ मुलांना विविध कॅटेगिरी मध्ये कलर बेल्ट एक्झॅम सर्टिफिकेट देण्यात आले. अतिशय जल्लोषाच्या वातावरणात हे सर्टिफिकेट प्रदान करण्यात आले. रायगड मध्ये सर्वात मोठी अशी बेल्ट एक्झाम  घेण्यात आली होती. विजय भोईर रायगड जिल्हा परिषद सदस्य यांनी सर्वांचे कौतुक केले व  पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here