कामगार मृत्यूप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल .

0

ठेकेदारांकडून नियमांचे उल्लंघन झाल्याची फिर्याद दाखल.

संगमनेर : संगमनेर शहरात सांडपाणी प्रकल्पाच्या भूमिगत गटार सफाई करताना गुदमरून एक कर्मचारी व त्याला वाचवायला गेलेल्या स्थानिक तरुण अशा दोघांना आपला जीव गमावा लागला. या प्रकरणी ठेकेदार मे.आर.एम.कातोरे अँड कंपनी आणि बी.आर.क्लिनिंगचे ठेकेदार अशा तिघांविरुद्ध संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे वृत्त अनेक वृतपत्रांनी दिले आहे.पण एक ही कामगार संघटनेचा नेता या घटनेचा निषेध करण्यासाठी पुढे आला नाही.ही खंत रविंद्र सूर्यवंशी अध्यक्ष स्वतंत्र म्युनिसिपल कंत्राटी कामगार युनियन यांनी व्यक्त केली.

  कोल्हेवाडी रोडवरील नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलजवळ गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली होती.या घटनेनंतर स्थानिक कार्यकर्त्यांनी शहर पोलिसात धाव घेऊन कडक कारवाई करण्याची मागणी केली होती.पोलिसानी नेहमी सारखी उदासीनता दाखवली.संगमनेर नगरपालिकेने सांडपाणी व्यवस्थापनासाठी एसटीपी प्रकल्प हाती घेतला आहे. या अंतर्गत शहरात भूमिगत गटारांचे जाळे टाकण्यात आले आहे. गुरुवारी दुपारी कोल्हेवाडी रोडवरील गटार साफसफाईचे काम सुरू असताना अतुल रतन पवार या कर्मचार्‍याचा गुदमरून मृत्यू झाला.त्याला वाचवण्यासाठी गेलेला रियाज जावेद पिंजारी (वय 21,रा.मदिनानगर) हा तरुणही गटारात गुदमरला आणि त्याचाही उपचारा दरम्यान गुरुवारी रात्री दुर्दैवी मृत्यू झाला.या प्रकरणी संगमनेर नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी अमजद पठाण यांनी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात मध्यरात्री एक वाजता फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीनुसार,एसटीपी प्लांटचे मुख्य ठेकेदार मे.आर.एम.कातोरे अँड कंपनीचे रामहरी मोहन कातोरे आणि निखिल रामहरी कातोरे तसेच बी.आर. क्लिनिंगचे ठेकेदार मुश्ताक बशीर शेख या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,संबंधित ठेकेदारांनी नगरपालिकेशी केलेल्या करारनाम्यातील अटी व शर्तींचे उल्लंघन केले आहे.एसटीपी प्लांटच्या भूमिगत गटारींच्या साफसफाईचे काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही योग्य ती काळजी घेतली नाही.तसेच,आरोग्य विभागाची पूर्वपरवानगी न घेता आणि आवश्यक सुरक्षा साधनांशिवाय मजुरांना गटारात उतरवले.यामुळे कर्मचार्‍याचा मृत्यू होऊ शकतो याची जाणीव असतानाही निष्काळजीपणाचे कृत्य केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.पुढील तपास पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. महानगरपालिका,नगरपालिका,नगरपरिषद,नगरपंचायत मध्ये कंत्राटी कामगारांनी जीव धोक्यात घालून कोणत्याही अधिकाऱ्याच्या दडपणा खाली काम करू नये.राज्यातील सर्व महानगरपालिका,नगरपालिका, नगरपरिषद,नगरपंचायत मधील कंत्राटी कामगारांनी संघटित झाले पाहिजे अन्यता असे बळी जातील.असे असंघटित कंत्राटी कामगारांच्या न्याय हक्का लढणारे कामगार नेते सरदार गुलाबसब शेख यांनी आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here