पोलिस कर्मचाऱ्यांना वारुंजीत मारहाण’

0

कराड : जमिनीच्या वहिवाटीच्या कारणावरून वारुंजीत झालेल्या मारामारीत दोन पोलिस कर्मचाऱ्यांनाही मारहाण करण्यात आल्याची घटना आज दुपारी घडली. याप्रकरणी शासकीय गणवेशातील पोलिस कर्तव्य बजावीत असताना सरकारी कामामध्ये हस्तक्षेप करून शिवीगाळ, धक्काबुक्की करून मारहाण केल्याप्रकरणी पोलिस कर्मचारी किशोर तारळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंकुश श्रीपती पाटील, प्रमोद अंकुश पाटील, धनाजी श्रीपती पाटील, शीला अंकुश पाटील, मंदाकिनी धनाजी पाटील (सर्व रा. वारुंजी, ता. कऱ्हाड) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.पोलिसांची माहिती अशी ः वारुंजी येथील जयवंत शंकर गुरव यांच्या मिळकतीत वहीवाटीबाबत हरकत अडथळा होत असल्याने पोलिस संरक्षण मिळण्यासाठी मागणी केली होती. त्यानुसार पोलिस कर्मचारी किशोर पंडित तारळकर, सोनाली पिसाळ, श्री. गायकवाड हे बंदोबस्तासाठी वारुंजीत गेले होते. त्या वेळी अर्जदार यशवंत गुरव, शशिकांत विलास गुरव, मोहन शंकर गुरव असे हजर होते.

त्या वेळी प्रमोद अंकुश पाटील हा तेथे आला व त्याने शशिकांत गुरव यांना संबंधित मिळकतीचा दावा न्यायालयात सुरू असून, तुम्ही येथे येऊ नका असे सांगितले. त्या वेळी शशिकांत गुरव यांनी त्यांना दिवाणी न्यायालयाने दिलेली आदेशाची प्रत दाखवली. त्यावरून त्यांचा वाद झाला. त्या वेळी पोलिस कर्मचाऱ्यांनी आपसांत भांडू नका असे सांगितले.

दरम्यान, अंकुश पाटील याने पत्र्याचे शेडमधून शशिकांत गुरव यांना अचानक दगड मारला. त्या वेळी शशिकांत गुरव व अंकुश पाटील यांच्यात मारामारी झाली. त्यादरम्यान प्रमोद पाटीलनेही शशिकांत गुरव यांच्याबरोबर वाद घातला. पोलिस कर्मचारी श्री. गायकवाड, सोनाली पिसाळ हे त्यांचा वाद सोडवण्यास गेल्यावर अंकुश पाटील याने श्री. गायकवाड यांना शर्टाची कॉलर पकडून धकाबुकी केली. त्याच वेळी धनाजी श्रीपती पाटील हे शेडमध्ये गेले. त्या वेळी शीला अंकुश पाटील व मंदाकिनी धनाजी पाटील या तेथे आल्या.

पोलिसांना शिवीगाळ करू लागल्या. त्यामुळे पोलिस कर्मचारी श्री. तारळकर भांडणे सोडविण्यासाठी गेले असता अंकुश पाटील याने त्यांनाही दगड मारून जखमी केले. त्यावेळेस शीला अंकुश पाटील व मंदाकिनी धनाजी पाटील यांनी महिला पोलिस कर्मचारी सोनाली पिसाळ यांना धक्काबुक्की केली. त्यावरून संबंधित पाच जणांविरोधात शासकीय गणवेशातील पोलिस कर्तव्य बजावीत असताना सरकारी कामामध्ये हस्तक्षेप करू शिवीगाळ, धक्काबुक्की करून मारहाण केल्याची गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here