कराड : कराडमधील सोमवार पेठेत झालेल्या घरफोडीतील सुमारे साडेनऊ तोळे वजनाचे दागिने अवघ्या 24 तासात हस्तगत करण्यात कराड शहर पोलिसांना यश आले आहे. शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने गुन्हा उघडकीस आणत कराड व मलकापूरमधील दोन संशयित युवकांना गजाआड केले आहे.
श्रेयश गणेश शिंदे (वय 22, सोमवार पेठ कराड) आणि अर्श शाहिद सुतार (वय 21 शास्त्रीनगर मलकापूर) अशी संशयितांची नावे आहेत. सोमवार पेठेतील एका घरात चोरी होऊन चोरट्यांनी जवळपास पावणे सहा लाखांचे दागिने लंपास केले होते. घरातील कपाटात ठेवलेले दागिने चोरीस गेल्यानंतर याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल करण्यात आली होती.
या तक्रारीनंतर पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर, हवालदार मोहसीन मोमीन, धीरज कोरडे, दिग्विजय सांडगे यांनी कसून चौकशी करत दोन्ही संशयित युवकांना ताब्यात यश मिळविले होते. त्यानंतर चौकशीतून ज्या सराफ व्यावसायिकास सोने विकले होते, त्या ठिकाणाहून सोने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.