अनिल वीर सातारा : भारतीय कर्मचारी संघ व भारतीय स्वाभिमानी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय जनसंपर्क अभियानांतर्गत जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयातील सांस्कृतिक भवनमध्ये रविवार दि.२० रोजी सकाळी १० वा.उद्घाटन जमियत उलेमा ए हिंदचे तालुकाध्यक्ष मुफ्ती ओबेद आतार यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थान जमियत उलेमा ए हिंद मक्का हलकाचे अध्यक्ष मुफ्ती मोहसीन बागवान भूषवणार आहेत.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुनील इंगवले,संजय इंगवले, अरुण देवकांत,चंद्रकांत खंडाईत,ज्योतिराम वाघ,निवृत्ती मगरे व जुबेर शेख उपस्थीत राहणार आहेत.याशिवाय,आदिनाथ बिराजे,ऍड. किशोर खरात,अमर कांबळे, आर.ए.कांबळे, बाजीराव आवळे,विलास जाधव,मुशर्रफ शिकलगार, सल्लाउद्दीन अरब,अमोल गडकर,तुषार मोतलिंग,सतीश माने व हंबीरराव बाबर उपस्थीत राहणार आहेत.प्रशिक्षक म्हणुन भारतीय कर्मचारी संघाचे राज्य कार्याध्यक्ष प्रा.सुनील देवरे काम करणार आहेत.याकामी,दि ऑल इंडिया बहुजन समन्वय समिती, युनायटेड मुस्लिम फोरम, राष्ट्रीय आदिवासी शेड्यूल्ड एरिया संघर्ष समिती व वीर सिद्धी वाहवाह युवा प्रतिष्ठान अथक असे परिश्रम घेत आहेत.