कोंढरीपाडा–कासवलेपाडा मुख्य रस्त्यावर लाईटचे लोकार्पण.

0

उरण दि १२(विठ्ठल ममताबादे )

कोंढरीपाडा ट्रान्सफॉर्मर डीपी ते कासवलेपाडा सार्वजनिक शौचालय या मुख्य रस्त्यावर गेल्या ३५ वर्षांपासून लाईटची कोणतीही व्यवस्था नव्हती. स्थानिक ग्रामस्थांच्या मागणीनंतर, ग्रामपंचायत सदस्या प्रमिला म्हात्रे आणि शिवसेना चाणजे विभागप्रमुख अक्षय म्हात्रे यांनी हा प्रश्न गांभीर्याने घेतला व त्याप्रमाणे ग्रामपंचायत चाणजे यांच्याकडे पत्राद्वारे ठराव मंजूर करून घेण्यात आला. या कामासाठी मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे व शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख अतुल भगत यांचे विशेष सहकार्य लाभले.सिडकोच्या निधीतून १० जी.आय. पाईप लाईट पोल बसवून काम पूर्ण करण्यात आले असून, नुकतेच या रस्त्यावरील लाईटचे लोकार्पण शिवसेना तालुका प्रमुख दिपक ठाकूर यांच्या हस्ते संपन्न झाले.

त्याप्रसंगी बोलताना त्यांनी या कामाचे कौतुक करून, भविष्यात या गावासाठी चांगला निधी देऊन पक्षातर्फे अधिकाधिक कामे केली जातील असे प्रतिपादन केले.या प्रसंगी विधानसभा संपर्कप्रमुख रमेश म्हात्रे, माजी सभापती व तालुका संघटक  चंद्रकांत पाटील, उपतालुका प्रमुख प्रशांत पाटील, चाणजे उपविभाग प्रमुख महेश पाटील, बांधकाम कामगार संघटना उपतालुका प्रमुख  महेंद्र घरत, प्रभारी शहरप्रमुख सुनील भोईर, युवासेना पूर्व उपविभाग प्रमुख भारत पाटील, ग्रामपंचायत सदस्या  प्रमिला म्हात्रे व महेश म्हात्रे, ज्येष्ठ शिवसैनिक रवींद्र म्हात्रे, राजेश कोळी तसेच अनेक महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या रस्त्यावरील लाईटचे काम हे शिवसेना पक्षाच्या माध्यमातून, नागरिकांच्या मागणीनुसार व वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाने पूर्ण करण्यात आले असून, पुढील काळातही गावाच्या आणि जनतेच्या हितासाठी अशीच कामे सुरू ठेवण्याचा आमचा निर्धार आहे असे शिवसेनेचे प्रतिनिधी अक्षय म्हात्रे यांनी प्रतिपादन केले व या कामासाठी ठराव मंजूर करून देणारे सरपंच अजय म्हात्रे, स्थानिक सदस्या प्रमिला म्हात्रे व ग्रामस्थांचे सुद्धा आभार मानले व त्यानंतर ग्रामस्थानी देखील या कामाचे कौतुक करून अशीच कामे भविष्यात करत राहा आणि शिवसेनेच्या माध्यमातून चांगली विकासकामे या गावामध्ये घडवून आणा असे शुभाशीर्वाद दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here