म्हसवड : वरकुटे- म्हसवड येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून एक लाख ७२ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सात संशयितांना अटक केली आहे. याप्रकरणी धनाजी रामचंद्र कोके, सत्यवान रामहरी चव्हाण, गणेश भास्कर चव्हाण, सुनील दत्तात्रय माने, भास्कर भानुदास चव्हाण, दादा भानुदास चव्हाण व सूरज जगन्नाथ लोखंडे (सर्व जण रा.बनवस्ती वरकुटे- म्हसवड) अशी संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वाकी- वरकुटे (ता. माण) गावच्या हद्दीत बनवस्ती येथील लक्ष्मी मंदिराच्या आडोशाला काही जण तीन पानी पत्त्यावर जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी सहकाऱ्यांसमवेत त्याठिकाणी छापा टाकून सात संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करून एक लाख ७२ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सहाय्यक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे, कर्मचारी अमर नारनवर, रूपाली फडतरे, नवनाथ शिरकुळे, अनिल वाघमोडे, वसीम मुलाणी, विनोद सपकाळ, महावीर कोकरे आदींनी कारवाईत सहभाग घेतला.