अनिल वीर सातारा : येथील बुधवारनाका ते मोळाचाओढा या दरम्यान मुख्य असणारा सार्वजनिक रस्त्याची दुरवस्था झाली आहे.त्यामुळे वाहन धारकांना कसरत करावी लागत असुन अपघातही होण्याचा धोका संभवतो.तेव्हा सम्बधितांनी योग्य ती कार्यवाही करून प्रवासी वर्गाना दिलासा द्यावा.अशी नागरिकांच्यावतीने मागणी भगतसिंग समितीचे परवेजभाई यांनी केली आहे.