संत रोहिदास समाज फाऊंडेशनतर्फे ७५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

0

महाबळेश्वर प्रतिनिधी :

सातारा आणि रायगड जिल्ह्यातील संत रोहिदास समाज आणि इतर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी संत रोहिदास समाज फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मौजे वाडा कुंभरोशी (ता. महाबळेश्वर, जि. सातारा) येथे एक भव्य गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात ४८ गुणवंत विद्यार्थ्यांसह नुकतेच दहावीत पदार्पण केलेल्या २७ अशा एकूण ७५ विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

या सोहळ्यात डॉक्टर, वकील, अभियंता, नर्सिंग, एम/बी फार्मसी, तसेच यूपीएससी परीक्षार्थी आणि दहावी-बारावी परीक्षांमध्ये उज्ज्वल यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, वह्या, पेन आणि शालेय बॅग देऊन गौरव करण्यात आला.

या गौरव सोहळ्याला अनेक मान्यवर आणि प्रमुख पाहुणे उपस्थित होते. शिरणार येथील भिकू कारंडे (पाटील) यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. सातारा जिल्हा सहकारी बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे, युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड, इंग्लंड येथील प्रा. डॉ. नंदकिशोर चंदन, मुंबई उच्च न्यायालयाच्या अॅडव्होकेट सौ. सीमा शिंदे, जिल्हा नियोजनu समिती सदस्य प्रवीण भिलारे आणि पंचायत समिती, महाबळेश्वर येथील विस्तार अधिकारी सुनील पार्टे यांची प्रमुख उपस्थिती होती. याव्यतिरिक्त, ज्येष्ठ समाजसेवक श्री. सीताराम धोंडीबा कदम, ज्ञानेश्वर कृष्णा वर्पे, सर्कल अधिकारी पांडुरंग राघू कारंडे, पांडुरंग भांबू कारंडे आणि संभाजी काळे हे देखील उपस्थित होते.

   यावेळी मार्गदर्शन करताना राजपुरे यांनी, “चर्मकार समाजातील विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात यशाची शिखरे गाठत आहेत, आणि त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत,” असे सांगितले. प्रा. डॉ. नंदकिशोर चंदन यांनी विद्यार्थ्यांना प्रगतीपथावर जाण्यासाठी सोपे मार्ग सांगितले आणि अशा कार्यक्रमांचे वारंवार आयोजन करण्याचे आवाहन केले, ज्यात ते नेहमीच सोबत राहतील असे वचन दिले. अॅडव्होकेट सौ. सीमा शिंदे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे कौतुक करत ते शहरी मुलांपेक्षा अधिक दृढनिश्चयी असतात असे म्हटले. तसेच, मुलांना पुढील ज्ञान देण्यासाठी वारंवार येऊन मार्गदर्शन करण्याची इच्छा व्यक्त केली.

   या सोहळ्यात अनेक विद्यार्थ्यांनी विशेष यश मिळवून गौरव प्राप्त केला. यामध्ये पदवी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमातील टॉपर विद्यार्थ्यांमध्ये डॉ. राजनंदिनी जनार्दन कदम (एम.डी. डॉक्टर), कु. कोमल मोहन कारंडे (एलएल.बी.), कु. मयुरेश महेंद्र कारंडे (एम.फार्मसी – ८७%), कुमार मनोज विठ्ठल ढेबे (एमपीएससी अभियंता), कु. आकांक्षा चव्हाण (बी.फार्म. – ७०.८०%) आणि सौ. पूजा हितेश चिकणे (बी.कॉम) यांचा समावेश होता.

बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये जयश्री दीपक गायकवाड (६६.३५%), सिद्धी हनुमंत पार्टे (६५.५०%) आणि प्रणाली बाळू कात्रट (६१.५०%) यांचा सन्मान करण्यात आला. दहावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये कु. प्रेरणा शिखरे (९१.२०%), कु. विद्दी कारंडे (८७%), कु. तेजस खाडे (८५%), कु. कृतिका अजित कारंडे (८०.८०%) आणि कु. सायली लालसिंग निकम (८६.२०%) यांचा गौरव करण्यात आला.

याव्यतिरिक्त, कार्तिक नितीन बागडे (नवोदय परीक्षा: ९७%, स्कॉलरशिप: ८८%) आणि कुमारी स्वप्नाली बोराने (९२%, मेटतळे) या विशेष उल्लेखनीय विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला.

   या भव्य सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी संत रोहिदास समाज फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. संस्थेचे अध्यक्ष संपत धोंडिबा कदम, उपाध्यक्ष पांडुरंग कृष्णा चिकणे, सचिव संजय लक्ष्मण कदम आणि खजिनदार प्रशांत पांडुरंग कारंडे यांनी विशेष परिश्रम घेतले. संचालक मंडळातून सदाशिव राघू कारंडे, चंदू कारंडे, संदीप तांबे, महेंद्र कारंडे, प्रशांत कारंडे, राजाराम कदम यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

वाडा कुंभरोशी शाखेतील पांडुरंग नामाजी कारंडे, जनार्दन पुनाजी कदम, अजित कारंडे, जितेंद्र कारंडे, मंगेश कारंडे, बाळू कदम, पंकज कारंडे, सचिन कारंडे, संतोष कारंडे, विकास काळे, सुभाष कदम यांचे विशेष योगदान होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संदीप मारुती कदम (सर) यांनी उत्कृष्टपणे केले.

   श्री संत रोहिदास समाज फाऊंडेशन ही संघटना केवळ गुणगौरव सोहळेच नव्हे, तर कोरोना काळात किट वाटप, अतिवृष्टीमध्ये योगदान, अतिदुर्बळ गरीब कुटुंबांना वैद्यकीय आणि शैक्षणिक खर्चात मदत असे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवत आहे. कार्यक्रमाच्या शेवटी, जितेंद्र कारंडे यांनी सर्व मान्यवर, उपस्थित पाहुणे आणि समाज बांधवांचे आभार मानले. हा सोहळा केवळ विद्यार्थ्यांचा सन्मान नव्हे, तर समाजाच्या नव्या पिढीला प्रोत्साहन देणारा एक दीपस्तंभ ठरला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here