अनिल वीर सातारा : एक ऑगस्ट रोजी लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांची जयंती महोत्सव साजरा करण्याकरता रिपब्लिकन पक्षाची महत्त्वपूर्ण सहविचार सभेचे आयोजन येथील मध्यवर्ती कार्यालय येथे सोमवार दि.१४ रोजी सकाळी ११ वा.करण्यात आलेले आहे.
यावेळी जयंती समारोह समितीचे अध्यक्ष निवड तसेच समितीच्या सदस्याची निवड करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने रिपब्लिकन पक्षाच्या सर्व आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित रहावे.प्रामुख्याने युवक आघाडी, महिला आघाडी, कामगार आघाडी, मुस्लिम आघाडी व तृतीयपंथी आघाडीसह सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे. याशिवाय,मेंबरशिपबाबत चर्चा करून आपले आय कार्ड घेण्यात यावे.असे आवाहन जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी केले आहे.