सातारा : (अनिल वीर यांजकडून) दलित महिला विकास मंडळाच्या सचिव अॅड. वर्षा देशपांडे यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या (युएनओ) वतीने ‘युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन अवॉर्ड २०२५’ हा पुरस्कार न्यूयॉर्क येथे झालेल्या कार्यक्रमात नुकताच प्रदान करण्यात आला.
लिंगभेदाच्या आधारे होणाऱ्या गर्भलिंग निवडी विरोधातील अॅड. वर्षा देशपांडे यांच्या संघर्षाची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आली.गर्भलिंग निवडी विरोधातील कार्यामध्ये त्यांनी क्षमतावाढ, जनजागृती, कायदेशीर कारवाई आणि समुदाय सहभाग या सर्व स्तरांवर भरीव कामगिरी केली आहे. यापूर्वी,हा पुरस्कार देशाला वैयक्तिक श्रेणीत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी व उद्योजक जे. आर. डी. टाटा यांच्या माध्यमातून मिळालेला होता.अॅड. देशपांडे यांचे विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.