खोट्या सोन्यावर तारण कर्ज घेण्याची मंगळवेढ्यासह तीन तालुक्यात साखळी

0

सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत खोटे सोने ठेऊन कर्ज घेतल्याप्रकरणी जिल्हा बँकेतील सहा शाखाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. खोटे सोने ठेऊन कर्ज घेतल्याच्या प्रकरणात बँकेची जवळपास २७ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे प्राथमिक पाहणीतून समोर आले आहे.
                शाखाधिकाऱ्यांनी बँकेची फसवणूक केल्याचा ठपका ठेवत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. खोट्या सोन्याच्या प्रकरणात संबंधित सोनार आणि कर्जदार यांच्यावरही कठोर कारवाई करण्याची तयारी बँकेने केली असल्याचे समजते.
                जिल्हा बँकेचे प्रशासक कुंदन भोळे यांनी दोन महिन्यांपूर्वी जिल्हा बँकेच्या सर्वच शाखांची अचानकपणे तपासणी करण्याचे आदेश दिले होते. ज्यावेळी तपासणीसाठी सोलापुरातील सोनारांचे पथक या शाखांमध्ये गेले, त्यावेळी या गोष्टी त्यांच्या उघडकीस आल्या आहेत.
        

जिल्हा बँकेचे प्रशासक भोळे यांनी बँकेच्या फसवणुकीचे प्रकरण गांभिर्याने घेतल्याचे समजते. या प्रकरणात पहिल्या टप्प्यात सहा शाखाधिकाऱ्यांना निलंबित केल्यानंतर संबंधित सोनार आणि कर्जदार यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याचे समजते.
                        माळशिरस तालुक्यातील शाखांमध्ये सोन्याच्या कर्जकारणातील सोने पिशव्या उघडल्यानंतर धक्कादायक प्रकार बाहेर आले आहेत. या सर्व प्रकरणाची व्याप्ती किती आहे?, यामध्ये कोणाकोणाची फसवणूक झाली आहे?, स्थानिक सोनारांचा यामध्ये किती सहभाग आहे?, यासह अन्य मुद्यांवर चौकशी करण्यासाठी स्वतंत्र चौकशी अधिकारीही नियुक्त केल्याचे समजते. या चौकशी अधिकाऱ्यांचा अहवाल आल्यानंतर हे प्रकरण अधिक कायदेशीररीत्या पुढे जाण्याची शक्यता आहे.
खोट्या सोन्याची व्याप्ती तीन तालुक्यांपर्यंत
जिल्हा बँकेत खोटे सोने ठेऊन कर्ज काढल्याचे प्रकरण माळशिरस तालुक्यातून उघडकीस आले आहे. अशाच पद्धतीने बँकेची फसवणूक झाल्याचे आता समोर येऊ लागले आहे. खोट्या सोन्यावर खरे कर्ज काढल्याच्या घटना शेजारच्या मंगळवेढा व सांगोला तालुक्यातही घडल्याचे आता समोर येऊ लागले आहे.
या प्रकरणाची व्याप्ती जिल्ह्यातील माळशिरस, मंगळवेढा व सांगोला तालुक्यापर्यंत असल्याचे आता समोर आले आहे. बिगर शेतीच्या थकीत कर्जाचा विषय सुटण्यापूर्वीच आता खोट्या सोन्यावर खरे कर्ज काढण्याचा विषय समोर आल्याने बँकेच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
खोट्या सोन्यावर तारण कर्ज घेण्याची तीन तालुक्यात साखळी, तपास सुरू
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माळशिरस तालुक्यातील शाखांमध्ये खोट्या सोन्यावर तारण कर्ज घेतल्याचे उघडकीस आल्यानंतर तेथील सहा शाखाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
         असे प्रकार मंगळवेढा आणि सांगोला तालुक्यातही घडल्याचा संशय असल्याने तेथीलही शाखांची बँकेच्या पॅनेलवरील सोनारांकडून तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
                        जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत खोटे सोने ठेऊन कर्ज घेतल्याप्रकरणी जिल्हा बँकेतील सहा शाखाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. खोटे सोने ठेऊन कर्ज घेतल्याच्या प्रकरणात बँकेची जवळपास २७ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे प्राथमिक पाहणीतून समोर आले आहे. शाखाधिकाऱ्यांनी बँकेची फसवणूक केल्याचा ठपका ठेवत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
खोट्या सोन्याच्या प्रकरणात संबंधित सोनार आणि कर्जदार यांच्यावरही कठोर कारवाई करण्याची तयारी बँकेने केली आहे. या प्रकरणात पहिल्या टप्यात सहा शाखाधिकाऱ्यांना निलंबित केल्यानंतर संबंधित सोनार आणि कर्जदार यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे.
                दरम्यान, बँकेचे प्रशासक कुंदन भोळे यांनी ही बाब गांभीर्याने घेतली असून, माळशिरसह सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यातील सर्वच शाखांची तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here