अकोले :- प्रतिनिधी
तालुक्यातील खेतेवाडी येथील येणारे धान्य बेकायदेशीरपणे अकोले विकास सेवा सोसायटीच्या गोदामात उतरवताना सजग नागरिकांनी पकडून दिले दोन व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला. खरोखर अजून गुन्हेगार मोकाट असल्याचे नागरिक म्हणत आहे. शासकीय रेशन दुकानातून पॉस मशीनद्वारे गरजू लाभार्थ्यांना देण्यात धान्य चा घोटाळा झाला आहे. अकोले सोसायटी पकडलेले धान्य महसूल विभागाच्या ताब्यात दिले होते. पुरवठा निरीक्षक संदीप निळे यांनी पंचनामा करीत हे धान्य पुन्हा शासकीय गोदामात पाठविले.
पुरवठा निरीक्षक संदीप निळे यांनी त्याचा तपास केला असता, चौकशीत रेशन धान्य वाहतूकीची मालमोटार (एमएच १७ बीडी १००) चे चालक कैलास चंद्रभान चव्हाण व अकोले विकास सेवा सोसायटीचे रेशन दुकानातील सेल्समन भरत मुरलीघर झोळेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे यांच्याकडून पुरवठा निरीक्षक अधिकाऱ्यांकडील ७ जुलै चा पंचनामा, पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्यांचा ९ जुलै रोजी सादर केलेल्या चौकशी अहवालानुसार, १० जुलैस पुरवठा निरीक्षक संदीप निळे यांना मालमोटार चालक व सेल्समन यांच्याविरुद्ध अकोले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. ७ जुलैस येथील अकोले विकास सेवा सोसायटीत तहसील कार्यालयाचे अधिनिस्त असलेल्या शासकीय गोदामातून खेतेवाडी गावातील लाभार्थ्यांनपर्यंत स्वस्त धान्य पोहच करण्यासाठी दुपारी १२ वाजता मालमोटारीत भरण्यात आले. पण हे धान्य खेतेवाडीस न नेता अकोले
विकास सेवा सोसायटीच्या गोदामात बेकायदेशीर उतरवण्यात येत होते. हा प्रकार संदीप भानुदास शेणकर व सचिन संदीप शेटे यांच्या निदर्शनास आला. त्यांनी चालक कैलास चंद्रभान चव्हाण (रा. पेमगिरी, ता. संगमनेर ) याच्याकडे चौकशी केली असता, हे वाहन गाडे ट्रान्सपोर्ट असल्याचे समजले, या वाहनावरील वाहतूक पास क्रमाक २८२५९७ आढळून आला. त्यानुसार गाडीत ७०.५ क्विंटल तांदूळ १४० गोण्या होत्या, परंतु अत्यावश्यक परवाना नव्हता. पुरवठा निरीक्षक संदीप निळे यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला, तांदळाच्या १०० पैकी ९६ गोण्या अकोले सोसायटी च्या स्वस्त धान्य दुकानात उतरवण्यात आल्या. तहसीलदार डॉ. मोरे यांनी निळे यांना चौकशीचे आदेश दिले आहे.