जामखेड शहरासह तालुक्यात अवैद्य व्यवसायिकांचे धाबे दणाणले
जामखेड तालुका प्रतिनिधी –
परिविक्षाधीन पोलीस उपाधिक्षक संतोष खाडे यांच्या पथकाकडून गेल्या काही दिवसांपासून जामखेड शहरासह तालुक्यात अवैद्य व्यवसायावर धडक कारवाई चालूच आहे. दि २३ रोजी रात्री १०.४५ वाजता जामखेड शहरातील नगर रोडवरील हाँटेल कृष्णा वर धडक छापा टाकला.या छाप्यात विनापरवाना ११०२५ रूपयांची देशी विदेशी दारू पकडण्यात आली. हाँटेल कृष्णा तुकाराम रामराव ढोले यांच्या मालकीचे आहे. पो काँ अमोल श्रीरंग आजबे यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र राज्य दारू अधिनियम कलम ६५ नूसार जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच
अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपाधिक्षक संतोष खाडे यांच्या पथकाच्या जिल्हाभर कारवाई सूरू आहे.यावेळी पोलीस उपाधिक्षक संतोष खाडे, पोलीस नाईक रवींद्र वाघ, पोलीस कॉन्स्टेबल अमोल आजबे, दीपक बोराटे, कुलदीप गुळवे, हनुमंत अडसूळ या पथकाने केली आहेत. रात्री पून्हा संतोष खाडे यांनी अचानक जामखेडला मोर्चा वळवला. पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या कधी पायी तर कधी गाडीने करत असलेल्या धडक पेट्रोलिंगची मोठी चर्चा चालू आहे. शहरासह तालुक्यात अवैद्य व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहे.पोलिस उपधिक्षक खाडे यांच्या कारवाईने अवैध धंदेवाल्यांनी धास्ती घेतली आहे पण जामखेड शहर सह तालुक्यातील पानटपरी व मावा विक्री करणारे यांचे अंधारातून धंदे चालुच असुन गुटखा व मावा अंधारातून जास्त किमतीने विक्री होत आहे अशी चर्चा नागरिकांमध्ये दिसुन येत आहे व तसेच तालुक्यात दुकानाने व टपरी वर चोरीने पेट्रोल डिझेल विक्री होत असताना दिसुत येत आहे
जामखेड शहरात खर्डा चौकामध्ये नाकाबंदी करत असताना विना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, ट्रिपल सीट, काळी काच, कर्कश आवाज, गाडीवर फॅन्सी नाव, सायलेन्सर आदी वाहनावर कारवाई करण्यात आली यावेळी पोलीस उपनिरीक्षक किशोर गावडे, पोलीस कॉ. दिनेश गंगे अमोल आजबे, खिळे, प्रवीण इंगळे, सचिन चव्हाण आदी पथकाने जामखेड खर्डा चौक येथे कारवाई केली व ही कारवाई अशीच चालू राहणार आहे असे पोलीस उपनिरीक्षक किशोर गावडे यांनी पत्रकारांना बोलताना व्यक्त केले