अकोले ( प्रतिनिधी ) :-
अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या अगस्ती इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, कॉम्प्युटर अॅप्लिकेशन अॅण्ड रिसर्च तसेच अगस्ती आर्ट्स, कॉमर्स अॅण्ड दादासाहेब रुपवटे सायन्स कॉलेज, अकोले या दोन महाविद्यालयांतील एकूण ३० विद्यार्थ्यांची निवड टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) या नामवंत आंतरराष्ट्रीय आयटी कंपनीच्या BPS (बिझनेस प्रोसेस सर्व्हिसेस) विभागात करण्यात आली आहे. या निवडीत एम.बी.ए. व एम.सी.ए. विभागातील १५ विद्यार्थी व अगस्ती महाविद्यालयाचे १५ विद्यार्थ्यांचा समावेश असून, विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या प्रबळ आत्मविश्वास, तांत्रिक कौशल्य व संवादकौशल्यामुळे ही उल्लेखनीय कामगिरी शक्य झाली.
११ जुलै २०२५ रोजी आय. एम. एस. सी. डी. आर. कॉलेज, अहिल्यानगर येथे पार पडलेल्या मुलाखतीत या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत ही निवड मिळवली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये एम.सी.ए. विभागाचे कु.जाधव प्रतीक्षा दिनकर, गायकवाड समृद्धी सुनील, गायत्री अरुण जाधव, ओमकार उल्हास गुंजाळ, वैद्य विवेक दिनकर, पांडे प्रनोटी संपत, नवले रोशन अनिल; एम.बी.ए. विभागाचे कु.आवारी निकिता रामनाथ, मंडलिक सुमित सुखदेव, दत्तात्रय विश्वास माने, माने मोहिनी संतोष, पथवे आरती विश्वास, वाकचौरे विशाल संतोष, गोर्डे ऋतुजा रावसाहेब, ढवळे छाया सुरेश, ओंकार संतोष जाधव, हासे वैभव सुदाम, झोळेकर शैलेश शिवाजी; बी.सी.एस. विभागाचे कु.दातखिळे संपदा रामनाथ, टाळेकर पूजा शिवाजी, सावंत पल्लवी नारायण; बी.सी.ए. विभागाचे कु.काळे कल्याणी ज्ञानेश्वर, चौधरी शीतल किरण; बी.कॉम. विभागाचे कु.डोंगरे ऋषिकेश चंद्रकांत, वाकचौरे अनिकेत बाळाजी, डावरे सिद्धी विलास, वाळुंज कोमल तुकाराम, भाटे ओंकार सुभाष, मालुंजकर तनुजा सीताराम; तसेच बी.एस.सी. विभागातील कु. तृप्ती दिगंबर कोकणे यांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट तयारी, प्रगल्भ आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवले असून त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या मेहनत, तयारी आणि आत्मविश्वासाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.
या यशस्वी निवड प्रक्रियेत प्रा. डॉ. देवदत्त शेटे (प्लेसमेंट अधिकारी – अगस्ती आर्ट्स, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज), प्रा. प्रशांत उगले (प्लेसमेंट अधिकारी – अगस्ती इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, कॉम्प्युटर अॅप्लिकेशन अॅण्ड रिसर्च) आणि सिद्धार्थ निळे (वरिष्ठ सहयोगी – TCS) यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले. संस्थेच्या प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी पूर्वतयारी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात आली होती.