बर्थ डे ../ हिजाब

0

वाढदिवससाहेबांचा

पारावार  ना आनंदा

तयारी करे कार्यकर्ते 

खुश करावे खाविंदा

पोस्टर लावा मोठाले

कित्येकांचा पोशिंदा

कळू  द्यायचे सर्वांना

टायगरअभी रे जिंदा

दमबाजीपुष्कळ करे

जमला बक्कळ चंदा

तिजोरी भरली  गच्च

कार्यकर्ता  असे खंदा

उत्तानी कटील डान्स

ठेवायचा बरका यंदा

बिबत्स  सर्वांना प्रिय

खेळ  करायचा  गंदा

जेसिबी भरभरू फुले

शेतकरी लुटा एखादा

हपापाचा मालगपापा

निर्माल्य होई  चिकदा

हाॅटेल टपरी वाल्यांना

लावा कायम  तकादा

फुकटात  चहा नास्ता

पोटभरसर्वांना दहादा

कसल्याअसल्या प्रथा

वायफळबाष्कळ धंदा

आकुंचित हो संस्कृती 

रे  कायद्याचा चेंदामेंदा 

हिजाब

शाळेमध्ये महत्वाचे

लेखणी  न्  किताब

कुठून आला  पडदा

हवाय नको हिजाब

जळजळीत भाषणे

ओतती वक्ते तेजाब

ऐकता पिटा टाळ्या 

वाहवा  रे लाजवाब 

हड्डीतोड ती वक्तव्ये 

खाई  कंटक कबाब

बोल बेधुंद अंधाधुंद

कसा त्यांचा रूबाब

बहकलेले शब्दकसे

विना ढोसता शराब

ऐकून घेतो शांततेने

बरळ त्यांची  खराब

लोकांची  करमणूक

खुशीत नाचतो माॅब

दंगल ग्रस्त  हो  देश

एवढाचं  यांचा जाॅब

वार दुस-या धर्मावर

नाही  राखला  आब

घाव घालून  वर्मावर

आपला वाढवे  दाब

अंकुशदंगलखोरांवर

द्यारे सडेतोड जबाब 

एवढे तरी  करू शके

निदान विचारा  जाब

– हेमंत मुसरीफ पुणे. 

  9730306996.

 www.kavyakusum.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here