सांस्कृतिक क्रांती झाल्याशिवाय राजकीय क्रांती होणार नाही ! 

0

अनिल वीर सातारा : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे,”सांस्कृतिक क्रांती झाल्याशिवाय राजकीय क्रांती होणार नाही.” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक पार्थ पोळके मार्गदर्शन करीत होते.

            येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ – छ. शिवाजी कॉलेज (घटक महाविद्यालय) व भाषा विभाग प्रागतिक साहित्य पंचायत महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने जी.के.ऐनापुरे लिखित, आयोध्या महाकादंबरी लोकार्पण व साहित्य संवाद सोहळा डॉ. एन.डी. पाटील सभागृहात संपन्न झाला.तेव्हा अध्यक्षस्थानावरून पार्थ पोळके बोलत होते.यावेळी लेखक व मान्यवर उपस्थित होते.ते पुढे म्हणाले,”रुसोनी क्रांती केली होती.तेव्हा बुद्धीजीवी लोकांनी प्रागतिक साहित्य पंचायतमध्ये योगदान द्यावे.समाजाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी फक्त वास्तववाद महत्वाचा आहे.मारुती कांबळे यांनी स्वतःच्या हिंमतीवर प्रगती केली. परंतु,अंबादास गुरुजीचे करायचे काय? जी.के. ऐनापुरे यांनी लिहिलेली कादंबरी प्रतिकात्मक आहे.खरोखरच ती कलाकृती जागृत करीत आहे. शिव,फुले, शाहु,आंबडेकर विचारधारेवर सांस्कृतिक चळवळ उभारूया.”

   लेखक जी.के.ऐनापुरे म्हणाले, “बुद्ध विचार वर्तमानकाळात चालत आहे.तेव्हा महापुरुष यांच्या विचाराशिवाय समाज सशक्त होऊ शकत नाही. संविधान वाचले पाहिजे.तरच खऱ्या अर्थाने लोकशाही राज्य मूल्ये जोपासता येतील.” संतोष पवार म्हणाले,”चित्रकाराच्या माध्यमातून कादंबरीतील पात्र आहेत.”असे स्पष्ट करीत ऐतिहासिक आढावा विशद केला.

                   एन.सुहास म्हणाले, “कादंबरीतून सामाजिक व्यवस्था आढळुन येत असून समाज नायक उभा केलेला आहे.” प्रा.राकेश वानखेडे यांनी आयोध्या कादंबरीतील सांस्कृतिक राजकारण यावर भाष्य केले.धम्म संगिनी रमा गोरख यांनी कादंबरीचा संपूर्ण आढावा घेत लेखनाची भूमिका स्पष्ट केली.डॉ.सुदाम राठोड यांनी आयोध्या कादंबरीचा अवकाश स्पष्ट केला.आयोध्या कादंबरीचे लोकार्पण व उद्घाटनपर प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे यांनी मनोगत व्यक्त केले.कदंबरीची भूमिका अभ्यासक शिवाजी राऊत यांनी मांडली. उपप्राचार्य डॉ.सुभाष वाघमारे यांनी प्रास्ताविक केले.डॉ.राजेंद्र तांबिले यांनी सूत्रसंचालन केले.प्रा.खुर्शीद आतार यांनी आभार मानले. सदरच्या कार्यक्रमास डॉ. आबासाहेब उमाप, अस्लम तडसरकर,विजय निकम, प्रा. दत्तात्रय जाधव,इंजि.रमेश इंजे,भगवान अवघडे,गणेश कारंडे,बाळासाहेब सावंत,संजय नितनवरे,अनिल वीर आदी मान्यवर,अध्यापक,अध्ययनार्थी व साहित्यप्रेमी मोठ्या संख्येनी उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here