दौड-रावणगाव, परशुराम निखळे : पुणे – सोलापुर महामार्गावर वाहनातून सोलापूरकडे पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या नागरिकांना स्वामी चिंचोली (ता.दौंड) येथे चहा पिण्यासाठी थांबले असताना अज्ञातांनी शस्त्राचा धाक दाखवून लुटले. तसेच एका अल्पवयीन मुलीला टपरी मागे घेऊन बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे . या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दि.30/06/2025 रोजी पहाटे-04:15 वा.चे सुमारास पंढरपुर येथे दर्षनासाठी इको चारचाकी गाडी क्रएम एच 14 डी एक्स 6526 हिने पुणे सालापुर महामार्गाने जात असताना मौजे स्वामी चिंचोली दौंड ता दौंड जि पुणे गावच्या हद्दीत महामार्गाशेजारी असलेल्या टपरीवर चहा पिण्यासाठी थांबले असता दोन अनोळखी व्यक्तींनी कोयताच्या धाक दाखवून मारून टाकण्याची धमकी देवून डोळयामध्ये लाल चटणी टाकुन त्यांच्या कडील रुपये 1,50,000/- किमतीचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढुन घेतले . तर त्यातील एका दरोडेखोराने एका मुलीला ओढुन नेवून तिच्या गळयाला कोयता लावुन मारून टाकण्याची धमकी देत जबरदस्तीने बलात्कार केला . .
सदर घटना सोमवार दि.३० पहाटे सव्वाचार वाजण्याच्या सुमारास घडली . पिडीत नागरिक पुणे जिल्ह्यातील असल्याचे कळते. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस, दौंड भिगवणचे पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले .घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी वेगात तपास सुरु केला आहे .या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यामध्ये गु,र, नं-४४८/२०२५ भा न्याय स कलम-६४,३०९(६).३५१(),३(५) बालकाचे लैगंक अत्याचारापासुन सरक्ंण कायदा कलम-४,६ शस्त अधिनियम कायदा कलम-४,२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.