पुणे/हडपसर प्रतिनिधी :
रयत शिक्षण संस्थेचे, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील इनोव्हेशन फाउंडेशन, एस. एम. जोशी कॉलेज हडपसर आणि उच्च शिक्षण विभाग, रयत शिक्षण संस्था, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘उद्योजकता’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डायरेक्टर जनरल एस.टी.पी. पुणे येथील सीईओ राजेंद्र जगदाळे व मैत्री फाउंडर सेलचे प्रमुख कमलेश पांडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रयत शिक्षण संस्थेचे, चेअरमन चंद्रकांत दळवी (IAS., Retd.) हे उपस्थित होते. तसेच कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेचे, सहसचिव प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे, सहसचिव (ऑडिट विभाग) प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कमलेश पांडे म्हणाले की, स्टार्टअप चालू करून त्यापासून उत्पन्नाचे साधन मिळवायला पाहिजे. त्यासाठी प्रत्येक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण कल्पना सांगितल्यास, इन्व्हेंशन, इंनोव्हेशन अँड इन्क्यूबेशन सेंटर (CIII) च्या माध्यमातून त्या नावीन्यपूर्ण कल्पनाचे स्टार्टअप चालू करता येईल. त्याच्या माध्यमातून आर्थिक नफा मिळवता येऊ शकतो. असे मत कमलेश पांडे यांनी व्यक्त केले.
सीईओ राजेंद्र जगदाळे यांनी जगभरातील सायन्स पार्कची माहिती सांगितली. तसेच ते म्हणाले की, भारतामध्ये पेटंट पब्लिश होते. परंतु त्याचे स्टार्टअप मध्ये रूपांतरण होत नाही. तरी आपण विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबरच व्यावसायिक शिक्षण पण द्यायला पाहिजे. आपण विद्यार्थ्यांचा व्यवसायभिमुख विकास करायला पाहिजे. असे मत राजेंद्र जगदाळे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष रयत शिक्षण संस्थेचे, चेअरमन चंद्रकांत दळवी (IAS., Retd.) म्हणाले की, रयत शिक्षण संस्थेतील तीनही इन्व्हेंशन, इंनोव्हेशन अँड इन्क्यूबेशन सेंटर (CIII) उर्जित अवस्थेमध्ये आणलेले असून, संस्थेच्या सर्व महाविद्यालयांना या सेंटरच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण माहिती दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबर नाविन्यपूर्ण विचार देणे आवश्यक असून, ती काळाची गरज आहे. भविष्यामध्ये इन्व्हेंशन, इंनोव्हेशन अँड इन्क्यूबेशन (CIII) सेंटरच्या माध्यमातून जॉब देणारे विद्यार्थी तयार केले जातील. असे मत रयत शिक्षण संस्थेचे, चेअरमन चंद्रकांत दळवी (IAS., Retd.) यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मीबाई भाऊराव पाटील इनोव्हेशन फाउंडेशनचे सीईओ. श्रीकांत कुंदन यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश साळुंखे यांनी तर कार्यक्रमाचे आभार उपप्राचार्य प्रो.डॉ.एकनाथ मुंढे यांनी केले. कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयातील प्राचार्य, संशोधन केंद्राचे प्रमुख व उद्योजकता विकास सेलचे प्रमुख बहुसंख्येने उपस्थित होते.