Salman Khan Became The Owner of New Delhi Franchise Indian Street Premier League Sports News Entertainment News

0

[ad_1]

Salman Khan Became The Owner of New Delhi Franchise : शाहरुख खान, शिल्पा शेट्टी आणि प्रीती झिंटा यांच्यानंतर सलमान खान देखील एका क्रिकेट टीमचा मालक बनला आहे. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमधील नवी दिल्ली संघाने सलमानला मालक म्हणून घोषित केले आहे. ही स्पर्धा टी 10 टेनिस बॉल क्रिकेट लीग आहे.  शाहरुख खान जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीग, इंडियन प्रीमियर लीगमधील कोलकाता नाईट रायडर्सचा मालक आहे. 

बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान आयएसपीएलच्या नवी दिल्ली फ्रँचायझीचा मालक असेल. आयएसपीएलने दुसऱ्या सीझनमध्ये विक्रमी लोकप्रियता मिळवली असताना ही नवीन टीम आयएसपीएलमध्ये जोडण्यात आली आहे. आयएसपीएलच्या दुसऱ्या सीझनला टीव्हीवर 28 दशलक्षाहून अधिक प्रेक्षक मिळाले आणि पहिल्या सीझनच्या तुलनेत 47 टक्के वाढ झाली.
सलमान खानने क्रिकेटच्या मैदानात एन्ट्री मारल्यामुळे नवी दिल्ली संघालाच बळकटी मिळणार आहे. इतकचं नाही तर संपूर्ण लीगला एक नवीन जोम आणि एक नवीन ओळख मिळणार आहे.

सलमान आता अशा सेलिब्रिटींच्या यादीत सामील झाला झाला आहे ज्यांच्याकडे आधीच इतर आयएसएल संघ आहेत. यामध्ये अमिताभ बच्चन (माझी मुंबई), सैफ अली खान आणि करीना कपूर खान (टायगर्स ऑफ कोलकाता), अक्षय कुमार (श्रीनगर के वीर), सूर्या (चेन्नई सिंघम्स), हृतिक रोशन (बंगलोर स्ट्रायकर्स) आणि राम चरण (फाल्कन रायझर्स हैदराबाद) सारखी नावे आहेत. 

 “क्रिकेट ही प्रत्येक भारतीय रस्त्याची धडधड आहे आणि जेव्हा ती ऊर्जा स्टेडियमपर्यंत पोहोचते तेव्हा आयएसपीएल सारखी लीग जन्माला येते. मला नेहमीच या खेळाबद्दल आवड आहे. आयएसपीएलशी जोडले गेल्याचा मला खूप आनंद आहे. ही लीग केवळ तळागाळातील क्रिकेटला प्रोत्साहन देत नाही तर प्रतिभावान खेळाडूंना एक मजबूत व्यासपीठ देखील देते. ही फक्त सुरुवात आहे. सीझन 3 सह, प्रेक्षकांना आमच्या संघाबद्दल अधिक जाणून घेता येईल आणि त्यांच्याशी खोलवरचे नाते निर्माण होईल अशी प्रतिक्रिया दिली आहे. 



[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here