IPL 2025 RCB Win Celebration In Pune Good Luck Chowk deccan police station filed case against 30 to 40 pune supporters

0

[ad_1]

IPL 2025 RCB Pune Police Action: इंडियन प्रिमिअर लीगमध्ये पहिलं जेतेपद पटकावल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाला अच्छे दिनऐवजी बुरे दिन सुरु झाले आहेत की काय अशा घडामोडी घडत आहेत. 3 जून रोजी ऐतिहासिक विजय मिळवत 18 वर्षांनी पहिल्यांदाच आयपीएल चषक उंचावल्यानंतर बंगळुरुचा संघ सेलिब्रेशनसाठी बंगळुरुमधील चेन्नस्वामी स्टेडियममध्ये पोहचला. मात्र या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आरसीबीच्या चाहत्यांनी एवढी गर्दी केली की तिथे चेंगराचेंगरी होऊन 11 जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणावरुन संताप व्यक्त केला जात असतानाच आता आरसीबीच्या विजयानंतरचं सेलिब्रेशन काही पुणेकरांनाही महागात पडलं आहे.

बंगळुरुमध्ये कारवाई अन् पुणे पोलीसही अॅक्शन मोडमध्ये

एकीकडे चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत 11 चाहत्यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी बेंगळुरू पोलिसांनी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) फ्रँचायझी, कर्नाटक राज्य क्रिकेट संघ (केएससीए) आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी डीएनए एंटरटेनमेंट यांच्याविरुद्ध गंभीर आरोपांसह आफआयआर दाखल केला आहे. तर दुसरीकडे आरसीबीच्या विजयानंतर 4 जूनच्या मध्यरात्री पुण्यात हुल्लडबाजी करणाऱ्यांविरोधातही पुणे पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. 

30 ते 40 जणांवर गुन्हा दाखल

आरसीबी समर्थकांना 4 जूनच्या मध्यरात्रीनंतर पुण्यातील रस्त्यांवर उतरुन जल्लोष करणे महागात पडले आहे. पुण्यातील गुडलक चौकात सेलिब्रेशनसाठी एकत्र जमलेल्या 30 ते 40 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डेक्कन पोलिसांनी ही कठोर कारवाई केली आहे.  4 जूनच्या रात्री आयपीएलचा चषक आरसीबी जिंकल्यावर गुडलक चौकात मोठ्या प्रमाणात जमाव एकत्र आला होता.  

कोणत्या आरोपांखाली कारवाई?

कोणतीही पूर्वसूचना न देता परवानगी न घेता गुडलक चौक, डेक्कन पुणे येथील सार्वजनिक रस्त्यावर जल्लोष करीत सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचा ठपका या पुणेकर आरसीबी चाहत्यांवर ठेवण्यात आला आहे. तसेच या सेलिब्रेशनदरम्यान इतर लोकांना इजा होईल अशा पद्धतीने मोठमोठ्या आवाजाचे ज्वालाग्रही फटाके फोडण्यात आले. त्याचप्रमाणे गुडलक चौकातून येणाऱ्या जाणाऱ्यांना अडथळा निर्माण करून हूल्लडबाजी करण्यात आल्याचंही म्हटलं आहे. या सेलिब्रेशनदरम्यान असभ्यवर्तन करून सार्वजनिक शांततेचा भंग केला म्हणून 30 ते 40 अनोळखी व्यक्ती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अनेक ठिकाणी झालं असं सेलिब्रेशन

4 जूनच्या रात्री देशातील अनेक शहरांमध्ये आरसीबीच्या विजयाचं सेलिब्रेशन करण्यात आलं. रात्री 10 वाजल्यानंतर फटाके फोडण्यास बंदी असतानाही कोणतीही परवानगी न घेता फटाके फोडण्यात आले. तसेच रस्त्यावर उतरुन वाहतूक कोंडी केल्याचेही अनेक प्रकार नोंदवण्यात आले. म्हणूनच आता या चाहत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यास सुरुवात झाली असून पुण्यातही कारवाई करण्यात आली आहे.



[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here