UK woman catches husband cheating with the help of electric toothbrush know how she found his extra marital affair

0

[ad_1]

Wife Catches Husband Cheating: युनायटेड किंग्डममधील एका महिलेने नवऱ्याच्या स्मार्ट इलेक्ट्रीक ब्रशच्या सहाय्याने नवऱ्याचं विवाहबाह्य संबंध असल्याचं पुराव्यासकट समोर आणलं आहे. या इलेक्ट्रीक ब्रशच्या डेटाच्या माध्यमातून तिने नवऱ्याचा भांडाफोड केला आहे. दातांसंदर्भातील स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून एका पत्नीने कशाप्रकारे स्मार्ट ब्रशमधील डेटा वापरुन नवऱ्याला रंगेहाथ पकडलं याबद्दल खासगी गुप्तहेर पॉल जॉन्सने संपूर्ण किस्सा सांगितला आहे.

नेमकं घडलं काय?

या विवाहित महिलेला दोन मुलं आहेत. मुलं नियमितपणे दात घासतात की नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी ही महिला अॅप्लिकेशनच्या माध्यमातून लक्ष ठेवायची. यासाठी तिने स्मार्ट टूथब्रश आणले होते. मात्र एकदा हा डेटा तपासताना तिला मुलांचे टूथब्रश मुलं शाळेत असतानाही वापरले जात असल्याची माहिती मिळाली. ज्यावेळेस नवरा आणि मुलं घरात नसतात तेव्हा ब्रश वापरला जात असल्याचं डेटा दाखवत होता. हा डेटा पाहून तिला आश्चर्याचा धक्का बसला.

“सुरुवातीला तिला याबद्दल फारसं काही वाटलं नाही. मात्र नंतर वारंवार एका ठराविक अचूक वेळेला आणि लोकेशन बेस टेडा मिळू लागला. मात्र ब्रश करताना व्यक्ती इमोशनलेस असल्याचंही डेटामधून स्पष्ट झालं. म्हणजे दर शुक्रवारी सकाळी 9 वाजता ऑफिसला जात असेल आणि तिचा ब्रश 10 वाजून 48 मिनिटांनी वापरला जात असेल तर शंका येणं सहाजीक आहे,” असं जॉन्सनने म्हटलं.

आधी तिने शाळेत चौकशी केली

आता हा ब्रश नेमका कोण वापरतं हे तपासून पाहण्याआधी या महिलेने आधी मुलांच्या शाळेत चौकशी केली. शाळेमध्ये मुलांचा हजेरीपट तपासून पाहिला असता मुलं शाळेतच होती असं स्पष्ट झालं. त्यानंतर तिने तिचा मोर्चा नवऱ्याकडे वळवला. नवऱ्याने आपण कायम या वेळी ऑफिसलाच असतो असं सांगितलं. मात्र डिजीटल डेटा वेगळीच माहिती देत होता. या महिलेने गुप्तहेराच्या मदतीने तपास केला असता तिला असं दिसून आलं की तिला नवरा ऑफिसला जातोय असं सांगून त्याच्या प्रेयसीला त्यांच्याच घरात भेटायचा. दर शुक्रवारी तो प्रेयसीला घरी आणून तिच्यासोबत वेळ घालवायचा असं त्याने कबूल केल्याचं हा खासगी गुप्तहेर म्हणाला.

‘द मिरर’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये जॉन्सनने, “शुक्रवारी एखादी व्यक्ती उशीरा ब्रश करतेय याबद्दल शंका वाटण्यासारखं काही नाही. मात्र वारंवार हाच डेटा येत असल्याने पत्नीला शंका आली. ठरलेल्या वेळी, ठरलेल्या ठिकाणी ब्रशचा वापर होत असल्याचं दिसून आलं,” असं सांगितलं. हा नवरा मुलांचे ब्रश वापरलायचा असं तपासानंतर स्पष्ट झालं आणि त्यामधूनच त्याचं अफेर उघडं पडलं.



[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here