Despite discount Maruti Suzuki old stock of luxury sedan Ciaz is not running out

0

[ad_1]

Maruti Suzuki : मारुति सुजुकीची लग्जरी सेडान सियाज अजूनही स्टॉकमध्ये शिल्लक आहे. खरं तर कंपनीने एप्रिल महिन्यातच ही कार बंद केली आहे. परंतु, डीलर्सकडे या कारचा स्टॉक जास्त असल्याने सध्या या कारची विक्री अजूनही सुरू आहे. मे महिन्यात  458 कार विकल्या गेल्या. तर मे 2024 मध्ये 730 कार विकल्या गेल्या होत्या. मात्र, कंपनीने अद्याप त्याचा स्टॉक पूर्णपणे संपल्याची पुष्टी केलेली नाही. कंपनी मे महिन्यात या कारवर 40 हजार रुपयांची सूट देखील देत होती. 2014 मध्ये लाँच झालेली सियाज ही नेक्साची दीर्घकाळाची एकमेव सेडान होती. या कारची सुरुवातीची किंमत 9.41 लाख रुपये आहे.

मारुति सियाजची वैशिष्ट्ये 

मारुति सुजुकीने फेब्रुवारी 2024 मध्ये त्यांच्या लग्जरी सेडान सियाजमध्ये नवीन सुरक्षा अपडेट्स सादर केले. कंपनीने त्यात 3 नवीन डुअल टोन रंग जोडले आहेत. डुअल टोनमध्ये ब्लॅक रूफसह पर्ल मेटॅलिक ओप्युलेंट रेड, ब्लॅक रूफसह पर्ल मेटॅलिक ग्रॅड्यूअर ग्रे आणि ब्लॅक रूफसह डिग्निटी ब्राउन रंग पर्यायांचा समावेश असेल. नवीन प्रकार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दोन्हीमध्ये लाँच करण्यात आला आहे.

कंपनीने सियाजच्या नवीन व्हेरिएंटच्या इंजिनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्यात जुने 1.5 लिटर पेट्रोल इंजिन असणार आहे. जे 103 bhp पॉवर आणि 138 Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि 4 स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. कंपनीचा दावा आहे की त्याचे मॅन्युअल व्हर्जन 20.65 किमी मायलेज देते आणि ऑटोमॅटिक व्हर्जन 20.04 किमी पर्यंत मायलेज देते.

मारुतिने सियाजमध्ये 20 हून अधिक सुरक्षा फीचर्स दिले आहेत. ज्यामध्ये हिल-होल्ड असिस्ट आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम. याचा अर्थ असा की हे सर्व प्रकारांमध्ये उपलब्ध असतील. डुअल एअरबॅग्ज, रियर पार्किंग सेन्सर्स, ISOFIX चाइल्ड सीट अँकर, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्यूशन (EBD) सोबत अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) सारखे फीचर्स देखील कारमध्ये उपलब्ध असतील. कंपनीच्या मते या सेडानमध्ये प्रवासी पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित असणार आहेत. 



[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here