Kim Jong Un North Korea regime Govt taking screenshots of citizens mobile phones every 5 minutes shocking revelation

0

[ad_1]

North Korea Viral News: सध्या जगात अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच हुकूमशाही असलेले देश आहेत. याच देशांपैकी एक म्हणजे उत्तर कोरिया! या देशातील हुकूमशाह किम जोंग उनच्या करामतींमुळे तो जगभरामध्ये (कु)प्रसिद्ध आहे. आता किम जोंग उनचा असाच एक नवा कारनामा ‘बीबीसी’ वृत्तसमूहाने समोर आणला आहे. उत्तर कोरियामधील जनतेचे स्मार्टफोन आता सरकारद्वारे नियंत्रित करण्यात येत असल्याचे ‘बीबीसी’ने अगदी पुराव्यासहीत जगासमोर आणलं आहे. या नव्या नियमामुळे उत्तर कोरियामधील लोकांना देशाबाहेरील कोणतीही माहिती प्राप्त करता येत नाही किंवा स्वतःच्या स्मार्टफोनचा खासगी वापर करता येत नाही, हे स्पष्ट झालं आहे.

देशातील सर्व फोनमध्ये फेरफार

उत्तर कोरियातील दैनंदिन जीवन आणि प्रत्येक माहितीसंदर्भात फार काटेकोरपणे सेन्सॉरशीप लावली जाते. त्यामुळेच बीबीसीने तस्करीच्या माध्यमातून उत्तर कोरियातील स्मार्टफोन मिळवला आणि त्याची तपासणी केली. या स्मार्टफोनमधील अँड्रॉईडचे कस्टमाइज व्हर्जन वापरले जाते. त्यामुळे या फोनमध्ये फक्त स्थानिक इंटरनेटशीच फोन कनेक्ट होतो. या इंटरनेटच्या माध्यमातून उत्तर कोरिया सरकारला जी आणि जेवढी माहिती दाखवायची आहे, तीच युझर्सला पुरविली जाते.

दर पाच मिनिटांनी घेतला जातो स्क्रिनशॉट

सदर स्मार्टफोनचे विश्लेषण करताना एक धक्कादायक बाब समोर आली. ती म्हणजे, या स्मार्टफोनद्वारे गुप्तपणे दर पाच मिनिटांनी स्क्रिनशॉट घेतला जातो. हे स्क्रिनशॉट एका गुप्त फोल्डरमध्ये सेव्ह केले जातात. फोनच्या युझरला हे स्क्रीनशॉट दिसत नाहीत मात्र सरकारी यंत्रणा हे स्क्रीनशॉट पाहू शकतात. जर स्मार्टफोनशी छेडछाड झाली किंवा जर बाहेरच्या देशातील माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला तर तो गुन्हा मानला जाईल, असं सरकारने यापूर्वीच जाहीर केलं आहे.

हे शब्द टाइपच होत नाही; आपोआप होतो बदल

एवढेच नाही तर एखाद्याला फोनवर काही संदेश टाइप करायचा असेल तर सरकारला जी भाषा अपेक्षित आहे, ती आपोआप रेकमेंड केली जाते. उदाहरणार्थ, उत्तर कोरियामधील स्मार्टफोनवर एखाद्याने कट्टर शत्रू असलेल्या दक्षिण कोरिया या देशाचं नाव टाइप केलं तर तो शब्द आपोआप उत्तर कोरियाच्या अजेंड्यानुसार ‘पपेट स्टेट’ (कळसूत्री बाहुली देश) असा होतो. उत्तर कोरिया सरकारने अधिकृतपणे शेजारच्या राष्ट्रासाठी हाच शब्द वापरण्याची भूमिका घेतली असून ती या स्मार्टफोनच्या माध्यमातूनही राबवली जाते. तसेच फोनवर “ओप्पा” हा शब्द टाइप केल्यास वॉर्निंग दिली जाते. हा शब्द फक्त भाऊ- बहिणच एकमेकांसाठी वापरू शकतात, असं या वॉर्निंगमध्ये सांगितलं जातं. टाइम केलेला हा शब्द मोबाईलमध्ये आपोआप ‘कॉम्रेड’ शब्दात बदलतो. ओप्पा हा शब्द दक्षिण कोरियात प्रामुख्याने मोठा भाऊ किंवा प्रियकरासाठी वापरला जातो.

केवळ इंटरनेटवर नियंत्रण नाही तर…

राजकीय अजेंडा रेटण्यासाठी आणि लोकांच्या संवादावर नियंत्रण ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर उत्तर कोरिया सरकारकडून केला जातो यासंदर्भात बीबीसीने अहवालात सविस्तर माहिती दिली आहे. या माध्यमातून फक्त इंटरनेटच ब्लॉक केले असे नाही तर लोकांच्या विचार करण्याच्या आणि व्यक्त होण्याच्या पद्धतीवरही अंकुश आणला जात असल्याचं अहवालामध्ये एका तज्ज्ञाचा हवाला देत नमूद करण्यात आलं आहे.



[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here