Pune Warriors beat Raigad Royals by 8 wickets; Pune Warriors’ second consecutive win in the Adani Women’s Maharashtra Premier League | चिन्मयी बोरफळेची चौकार फलंदाजी: पुणे वॉरियर्सचा रायगड रॉयल्सवर 8 गडी राखून विजय; अदानी महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत पुणे वॉरियर्सचा सलग दुसरा विजय – Pune News

0

[ad_1]

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग(डब्लूएमपीएल) 2025 स्पर्धेत तिसऱ्या दिवशी तिसऱ्या लढतीत जलद गती गोलंदाज २० वर्षीय चिन्मयी बोरफळे(४-१९) हिने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पुणे वॉरियर्स संघाने रायगड रॉय

.

गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत पुणे वॉरियर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला व तो त्यांच्या गोलंदाजांनी अचूक ठरविला. आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात असलेल्या रायगड रॉयल्सची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. कर्णधार किरण नवगिरे(०)ला पुणे वॉरियर्सच्या चिन्मयी बोरफळेने पहिल्याच चेंडूवर झेल बाद केले. पाठोपाठ भाविका अहिरे(८) देखील बाद झाली. तर चिन्मयी बोरफळेने ऋतुजा गिलबिले(०)ला त्रिफळा बाद करून आपला वैयत्तिक तिसरा बळी घेत रायगड रॉयल्स संघाला ४.२ षटकात ३ बाद ३९ असे अडचणीत टाकले. त्यानंतर आदिती गायकवाड १३ धावा काढून बाद झाली. ५ बाद २४ धावा अशी एकवेळ खराब स्थिती झालेली असताना आयेशा शेखने २४ धावा काढून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण चिन्मयी बोरफळेने आयेशा शेखला झेल बाद करून स्पर्धेतील आतापर्यंत सर्वाधिक बळी घेण्याचा मान मिळवला. तळातील फलंदाज यशोदा घोगरे(नाबाद १६) व रोशनी पारधी(नाबाद १४) यांनी आठव्या विकेटसाठी १० चेंडूत २३ धावांची भागीदारी करून रायगड रॉयल्सला १०२ धावांपर्यंत मजल गाठून दिली. पुणे वॅरियर्सकडून चिन्मयी बोरफळेने १९ धावात ४ गडी महत्वपूर्ण टिपले. समृद्धी डाळेने १९ धावात २ गडी तर, इशिता खळेने १३ धावात १ गडी बाद केला.

१०२ धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या पुणे वॉरियर्स संघाने हे आव्हान १४.५ षटकात २बाद १०३धावा करून पूर्ण केले. अक्षया जाधवने ३७ चेंडूत ५चौकाराच्या मदतीने नाबाद ३६ धावांची संयमी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. अक्षया व खुशी मुल्ला(२९धावा) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ३२चेंडूत ३१ धावांची भागीदारी केली. पण प्रज्ञा वीरकरने ख़ुशी मुल्लाला त्रिफळा बाद करून ही भागीदारी संपुष्टात आणली. त्यानंतर अक्षयाने श्वेता माने(नाबाद २३धावा)च्या साथीत चौथ्या विकेटसाठी ३३ चेंडूत ४२ धावांची भागीदारी करून संघाचा विजय सुकर केला.

[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here