Cricketer Virender Sehwag exposes theory behind Rohit Sharma Test retirement did shocking statement | “सिलेक्टर्सनी ऑफर दिली असावी…” वीरेंद्र सहवागने उलगडले रोहित शर्माच्या टेस्ट निवृत्तीमागचे कारण

0

[ad_1]

Virender Sehwag theory behind Rohit Sharma Test Retirement: रोहित शर्माने अचानक टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. रोहितने इंस्टाग्रामवर स्टोरी टाकून याबद्दलची घोषणा केली. तो वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळणे सुरूच ठेवणार आहे. भारतीय संघाचा माजी सलामीवीर आणि स्फोटक फलंदाज वीरेंद्र सहवागने रोहित शर्माच्या टेस्ट क्रिकेटमधून घेतलेल्या निवृत्तीचे कौतुक केले. आता सहवागने रोहितच्या निवृत्तीवर मोठा खुलासा करत खळबळ उडवली आहे. “कदाचित सिलेक्टर्सनी रोहितला कर्णधारपदापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला असावा, म्हणूनच त्याने निवृत्ती घेतली असावी,” असं विधान वीरेंद्र सहवागने केलं आहे.

नेमकं काय म्हणाला सहवाग?

क्रिकबझसोबत बोलताना वीरेंद्र सहवाग म्हणाला की, ” माझ्या ऐकण्यात आलं होतं की रोहित इंग्लंड दौऱ्याची तयारी करत होता. पण मग अचानक निवृत्ती जाहीर केली. माझ्या मते, निवडकर्त्यांनी त्यांना काही पर्याय दिले असावेत. कदाचित त्यांनी सांगितलं असावं की, ‘तुम्ही खेळू शकता, पण कर्णधार म्हणून नाही’ किंवा इंग्लंड दौर्‍यासाठी निवड केली जाणार नाही.”

हे ही वाचा: IPL 2025 पुन्हा कधी सुरू होणार? जाणून घ्या महत्त्वपूर्ण माहिती

 

तो पुढे म्हणाले, “निवडकर्त्यांनी निर्णय घेतल्यानंतर कदाचित रोहितने तो संकेत ओळखून आधीच निवृत्ती जाहीर केली. यावरून त्याची परिपक्वता दिसते.”

हे ही वाचा: चेहऱ्यावर शांती आणि आनंद… धर्मशाळेहून वंदे भारत ट्रेनने सुरक्षित परतला पंजाब आणि दिल्लीचा संघ, खेळाडूंचा Video Viral

 

सहवागने केले कौतुक 

सहवाग यांनी रोहितच्या क्रिकेट कारकिर्दीचेही भरभरून कौतुक केले. “जो कोणी क्रिकेटचा चाहता असेल, तो रोहितसारख्या खेळाडूला नक्कीच मिस करेल. त्याने टेस्ट, वनडे आणि T20 सगळ्या फॉरमॅट्समध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. हो, हे नक्की वाटतं की त्यांने अजून थोडं आणखी खेळायला हवं होतं. 100 टेस्ट मॅचपर्यंत पोहोचायला हवं होतं.  पण त्याने निर्णय घेतलाय. त्याचे करियर छान होते.” असेही तो म्हणाला. 

हे ही वाचा: 2 संघ, 25 हजारांहून अधिक प्रेक्षक अन्… IPL च्या अध्यक्षांनी सांगितले ‘त्या’ दिवशी धर्मशालेत नेमकं काय घडले?

 

रोहित शर्माची टेस्टमधून निवृत्ती ही केवळ वैयक्तिक निर्णय नसून, संघातील बदलती गणितं आणि निवड समितीच्या रणनीतीचा भाग असू शकते, असा संकेत वीरेंद्र सहवागने दिला आहे. 



[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here