[ad_1]
बौद्ध पौर्णिमेच्या लख्ख चंद्रप्रकाशात वाशिम-अकोला जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या काटेपूर्णा अभयारण्यात वन्यजीवांची गणना करण्यात आली. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतून आलेल्या वन्यप्रेमींनी रात्रभर मचानावर जागून या निसर्ग अनुभवाचा आनंद लुटला. चंद्राच्या
.
सुमारे 6500 हेक्टरमध्ये पसरलेल्या या अभयारण्यात नैसर्गिक व कृत्रिम पानवठ्यांभोवती 10 मचाने उभारण्यात आले होते. बौद्ध पौर्णिमा ही विशेष मानली जाते कारण चंद्रप्रकाश तेजस्वी असतो आणि उन्हामुळे प्राणी रात्री पाण्यासाठी बाहेर पडतात. काटेपूर्णा अभयारण्यात बिबटे, चितळ, सांबर, काळवीट, नीलगाय, तसेच अनेक दुर्मिळ पक्ष्यांच्या प्रजातीही आढळतात. प्राण्यांचे आवाज, पक्ष्यांची किलबिल, आणि निसर्गाच्या सानिध्यात मिळालेला अनुभव वन्यप्रेमींना आयुष्यभर लक्षात राहणारा ठरला.
दरम्यान, विविध प्राण्यांचे व पक्ष्यांचे आवाजही ऐकावयास मिळाल्याने निसर्ग व्यासंगाचा परिपूर्ण आनंद लूटता आल्याने वन्यप्रेमींनी समाधान व्यक्त केले. यावेळी काही वन्यप्रेमींना बिबट्याचेही दर्शन झाल्याने त्यांचा आनंद काही वेगळाच होता. या निसर्ग अनुभव कार्यक्रमाचे नियोजन विभागीय अधिकारी निमजे व वनपरिक्षेत्र अधिकारी पवन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल एन.डी. तुपकर, वनरक्षक एन.ए. खोडके, पी.बी. यादव, ए.पी. पोटे, पी.डी कांबळे, पी.के राठोड यांच्यासह वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात आले होते.
काटेपूर्णा-सोहळ वन्यजीव अभयारण्यातले वनपरिक्षेत्र अधिकारी पवन जाधव म्हणाले, वैशाख पोर्णिमेच्या रात्री दरवर्षी प्राणी गणनेची गणेनेची उपलब्धता निसर्ग प्रेमींसाठी केलेली असते. याला निसर्ग अनुभव उपक्रम म्हणून आम्ही नाव दिले आहे. निसर्ग अनुभव या उपक्रमामध्ये काटेपूर्णा अभयारण्यात एकुण 10 मच्यान आम्ही निसर्ग, वन्यजीव प्रेमींसाठी पणवठ्याच्या शेजारी उभारल्या होत्या. ऑईनलाईन पद्धतीने याची बुकिंग करून, निसर्ग प्रेमींनी रात्रभर याचा अनुभव घेतला आहे. रात्री आभाळ व अवकाळी पाऊस परिस्थिती मुळे प्राणी गणनेवर थोड्या प्रमाणात फरक पडला.
वाशिम येथील पर्यटक विकी डोंगरे म्हणाले, काल वाशिम वरून मी प्राणी गंणनेसाठी काटेपूर्णा अभयारण्य मध्ये आलो होतो. या प्राणिगणनेचा मला छान अनुभव आला, रात्री जवळपास १२ वाजता आमच्या मचाण जवळील पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी एक बिबट पण आला होता. ही रात्रीची ती नैसर्गिक शांतता अनुभवण्याची एक चांगली संधी मला वनविभागाकडून मिळाली.
प्राणी गणनेत नोंद झालेले एकुण प्राणी- 369
बिबट – 03 चितळ- 87 चिंकारा- 02 अस्वल- 01 निलगाय- 64 रानडुक्कर- 57 कोल्हा- 09 मोर- 37 उदमांजर- 05 रानमांजर- 6 सायाळ- 11 ससा- 04 भेकडी- 05 वानर- 75 रानकुत्रा- 03
[ad_2]