virat kohli with anushka sharma visit premanad ji maharaj in vrindavan after test retirement

0

[ad_1]

Virat Kohli Test Retirement : भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) याने 12 मे रोजी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. यापूर्वी विराट हा टी 20 क्रिकेटमधून सुद्धा निवृत्त झाला होता. सोमवारी विराटने अचानकपणे टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्याने त्याच्या फॅन्सला धक्का बसला. जगभरातील अनेक दिग्गज व्यक्तींनी विराटच्या टेस्ट कारकिर्दीची प्रशंसा करणाऱ्या पोस्ट शेअर केल्या. टेस्ट आणि टी 20 मधून विराट निवृत्त होत असला तरी वनडे फॉरमॅटमध्ये तो भारताकडून खेळणार आहे. टेस्टमधील निवृत्तीनंतर लगेचच मंगळवारी विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासह (Anushka Sharma) वृंदावनच्या प्रेमानंद महाराजांना (Premanad Ji Maharaj) भेटायला गेला. 

प्रेमानंद महाराजांनी विराटला केला प्रश्न : 

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा दोघे प्रेमानंद महाराजांना भेटायला गेले. तेव्हा त्यांनी काहीवेळ त्यांना प्रवचन देत उपदेश सुद्धा केला. महाराजने कोहली आणि अनुष्का सोबत खूप वेळ चर्चा केली. विराट मनलावून महाराजांचे प्रवचन ऐकत होता. प्रेमानंद महाराजांना भेटून विराट अनुष्का दोघे खूप खुश दिसले. दोघांच्या चेहऱ्यावर संतुष्टि दिसत होती. विराट आणि अनुष्का महाराजांना भेटायला आले तेव्हा प्रेमानंद महाराजांनी विराटला प्रश्न केला की, ‘तू खुश आहेस?’, यावर विराटने ‘हो, आता ठीक आहे’ असे उत्तर दिले. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा  श्री राधाकेलीकुंज आश्रममध्ये जवळपास तीन तास थांबले होते. विराट कोहली काही महिन्यांपूर्वी चांगल्या फॉर्मात नव्हता. तेव्हा प्रेमानंद महाराज यांच्या आश्रमामध्ये त्याने भेट दिली होती. पत्नी आणि दोन मुलांसह आशीर्वाद सुद्धा घेतला होता. त्यानंतर कोहलीने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तान विरुद्ध शतकीय कामगिरी केली होती. 

विराट कोहलीचं टेस्ट करिअर : 

विराटने आतापर्यंत क्रिकेटचे तीनही फॉरमॅट मध्ये एकूण 539  सामने खेळले आहेत.   विराटने त्याच्या टेस्ट करिअरमध्ये 123 सामन्यांमध्ये एकूण 9230 धावा केल्या आहेत. यात त्याने 30 शतक, 7 द्विशतक आणि 31 अर्धशतक केली आहेत. त्याने 302 वनडे सामन्यात 51 शतकांसह 14181 धावा, टी20 मध्ये 1 शतकासह 4188 धावा केल्या आहेत.   

हेही वाचा : IPL 2025 चं नवं वेळापत्रक जाहीर! मुंबई इंडियन्सचे सामने ‘या’ दिवशी होणार

निवृत्त होत असताना काय म्हणाला विराट? 

विराटने निवृत्ती जाहीर करत असताना लिहिले की, ‘टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्यांदा मी पहिल्यांदा बॅगी ब्लू रंगाचा पोशाख घातला होता त्याला 14 वर्षे झाली. खरं सांगायचं तर, या फॉरमॅटमध्ये मला असा प्रवास करावा लागेल याची मी कधीच कल्पनाच केली नव्हती. या फॉरमॅटने माझी खरी परीक्षा घेतली, मला घडवले आणि आयुष्यभर मी जे धडे सहन करेन असे धडे कसोटी क्रिकेटने शिकवले. पांढऱ्या रंगाच्या जर्सीत क्रिकेट खेळण्यात काहीतरी खास खोलवर रुझलेले वैयक्तिक गुण असतात’. 

पुढे म्हणाला की, ‘विराट शांतपणे खेळणे, लांबलचक दिवस, छोटे छोटे पण महत्त्वाचे क्षण जे कोणीही पाहत नाही पण ते कायम तुमच्यासोबत राहतात. मी या फॉरमॅटमधून बाहेर पडतोय, हे सोपे नाही – पण हेच मला आता योग्य वाटत आहे. मी माझ्याकडे जे होते ते सर्व काही दिले आहे आणि त्याने मला माझ्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त परत दिले आहे. मी कृतज्ञतेनं अन् भरल्या मनाने निघून जातोय ते या खेळासाठी, मी ज्या लोकांसोबत मैदान शेअर केले त्यांच्यासाठी आणि वाटेत मला भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी. मी माझ्या कसोटी कारकिर्दीकडे नेहमी हसतमुखाने पाहत राहीन याची मला खात्री आहे’. 



[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here