[ad_1]
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नागपूर विभागाच्या इयत्ता दहावीच्या निकालात मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ३.९५ टक्क्यांनी घसरण झाली आहे. २०२४ मध्ये नागपूर विभागाच्या इयत्ता दहावीच्या निकालात २०२३ च्या तुलनेत २.२३ टक्क्यांनी वाढ झाली होती
.
दहावीत नागपूर जिल्हा विभागामध्ये ९४.३९ टक्क्यांसह अव्वल ठरला आहे. याही वर्षी निकालात मुलींनीच बाजी मारली आहे.नागपूर विभागीय शिक्षण मंडळाअंतर्गत नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली या सहा जिल्ह्यांचा समावेश होतो.
विभागीय मंडळामार्फत मार्च २०२५ मध्ये माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता दहावीच्या परीक्षेकरिता नागपूर विभागातून १ लाख ४७ हजार ३५९ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यातील १ लाख ४६ हजार ११३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून यापैकी १ लाख ३२ हजार ६५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये २७,४६४ विद्यार्थी ७५ टक्के
गुण मिळवित प्रावीण्यासह प्रथमश्रेणीत उत्तीर्ण झाले.४२,८८२ विद्यार्थी ६० टक्केगुण मिळवित प्रथम श्रेणीत, ४५,१८३ विद्यार्थी ४५ टक्के गुण मिळवित द्वितीय श्रेणीत, १७,१२१ विद्यार्थी ३५ टक्के गुण मिळवित तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. विभागात एकूण १ लाख ३२ हजार ६५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून टक्केवारी ९०.७८ टक्के इतकी आहे. निकालानंतर विद्यार्थ्यांनी मागणी केल्यास त्यांना शिक्षण मंडळाकडून उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागपूर विभागातील नागपूर, गोंदिया, भंडारा, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांमध्ये एकूण १ लाख ४७ हजार ३५९ परीक्षार्थींनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. सर्वाधिक ५६ हजार ३०० विद्यार्थी नागपूरचे होते.
असा आहे नागपूर विभागाचा निकाल
भंडारा | ८८.४८टक्के |
चंद्रपूर | ८८.४५ टक्के |
नागपूर | ९४.३९ टक्के |
वर्धा | ८८.८६ टक्के |
गडचिरोली | ८२.६७ टक्के |
गोंदीया | ९२.८४ टक्के |
[ad_2]