[ad_1]
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांना एकाच तराजूत तोलण्याचे पाप केले आहे. त्यामुळे भारताची जागतिक प्रतिमा आणि दहशतवादाच्या विरोधातील लढाईला ठेच पोहोचत असल्याने त्यांचे विधान भारतीय मनाला पटणारे नाही. त्यामुळे केंद्र स
.
या संदर्भात आमदार रोहित पवार यांनी एका पोस्टच्या माध्यमातून डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्यावरून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर एक अर्थाने टीका केली आहे. अमेरिकेचा दावा खोडून काढत अमेरिकेला भारताची कणखरता दाखवण्याची गरज होती, असे देखील रोहित पवार यांनी म्हटले आहे.
रोहित पवार यांनी केलेली पोस्ट देखील पहा…..
“युद्धविराम करण्यासाठी दोन्ही राष्ट्रांना व्यापार थांबवण्याची धमकी दिली आणि युद्ध थांबवल्याचे,” डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान भारताच्या सार्वभौमत्वावर घाला घालणारे तर आहेच शिवाय डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानकडे एकाच चष्म्याने बघत एकाच तराजूत तोलण्याचे पाप केले आहे. यामुळे भारताची जागतिक प्रतिमा, भारताचे सार्वभौमत्व, दहशतवादाविरुद्धची लढाई याला ठेच पोचत असल्याने ट्रम्प यांचे विधान भारतीय मनाला पटणारे नाही.
काल संध्याकाळी पंतप्रधानांच्या देशाला संबोधित करण्याच्या अर्धा तास आधी डोनाल्ड ट्रम्प यांनी हे धक्कादायक विधान केले असता पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात अमेरिकेचा दावा खोडून काढत अमेरिकेला भारताची कणखरता दाखवण्याची गरज होती. संपूर्ण देश, सर्व राजकीय पक्ष सरकारसोबत आहेत, परंतु अमेरिकेसारखा देश असली विधाने करत असताना केंद्र सरकार याबाबत बोलत नसेल तर हे मात्र ट्रम्प यांच्या विधानाहून अधिक दुःखद आहे.
या संवेदनशील विषयांवर चर्चा करणे सद्यस्थितीत योग्य नसले तरी केंद्र सरकारला या प्रश्नांची उत्तरे देशाला द्यावीच लागतील, शक्य तेवढ्या लवकर केंद्र सरकारने अधिवेशन बोलवून जनतेला सत्य सांगितले पाहिजे.
रेल्वेने प्रवास करताना जवानांसाठी राखीव जागा ठेवण्याची मागणी
आमदार रोहित पवार यांनी आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी एक व्हिडिओ देखील पोस्ट केला असून या माध्यमातून रेल्वेत जवानांसाठी राखीव जागा ठेवण्याची मागणी केली आहे. यामध्ये ते म्हणाले की, तळहातावर प्राण घेऊन देशासाठी रक्त सांडणाऱ्या जवानांना रेल्वतून प्रवास करताना मात्र टॉयलेटशेजारची जागा मिळत असेल तर यासारखं दुसरं दुर्दैव नाही. संताप आणि शरम आणणारी ही गोष्ट आहे. सोशल मिडियात आलेला हा व्हिडिओ बघून खूप चीड आली. युद्धाच्या वेळी कळसावर जाणारी लोकांची देशभक्ती एरवी जाते कुठं? असा प्रश्न यानिमित्ताने पडल्याशिवाय राहत नाही. ज्यांच्या जीवावर आपण शांत झोप घेतो त्या जवानांना सदासर्वकाळ सन्मान मिळालाच पाहिजे आणि म्हणूनच रेल्वेने प्रवास करताना जवानांवर ही वेळ येऊ नये, यासाठी सरकारने त्यांना राखीव जागा ठेवण्याचा निर्णय तातडीने घ्यावा…
[ad_2]