Four people in the district were honored with the title ‘Shiv Chhatrapati’. | जिल्ह्यातील चौघांचा ‘शिवछत्रपती’ने सन्मान हे भूषणावह: पालकमंत्री विखे यांचे प्रतिपादन, शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू, प्रशिक्षकांचा सन्मान – Ahmednagar News

0



.

विविध क्रीडा प्रकारात आपले नैपुण्य दाखून शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित झालेल्या खेळाडूंमुळे क्रीडा क्षेत्रात जिल्ह्याचा नावलौकीक उंचावला आहे. चारही खेळाडूंनी कष्टाने साध्य केलेले यश महत्त्वपूर्ण आहे. एकाचवेळी जिल्ह्यातील चार खेळाडूचा शिवछत्रपती पुरस्काराने सन्मान व्हावा ही बाब भूषणावह आहे. या यशाने जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राला आणि नव्या पिढीला प्रेरणा मिळेल, असा विश्वास पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केला.

जिल्हाधिकारी कार्यालयात शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडू आणि प्रशिक्षकांचा सन्मान पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार काशिनाथ दाते, अमोल खताळ, विक्रम पाचपुते, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, मनपा आयुक्त यशवंत डांगे, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, आदी उपस्थित होते.

क्रीडा मार्गदर्शकाचा जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार विजेत्या धनुर्विद्या प्रशिक्षक शुभांगी रुपडे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्या वेटलिफ्टिंग खेळाडू कोमल वाकडे, कबड्डी खेळाडू शंकर गदाई यांचा पालकमंत्री विखे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कबड्डी खेळाडू अस्लम इनामदार याच्या भावाने सन्मान स्वीकारला.

मंत्री विखे म्हणाले, जिल्ह्यातील ग्रामीण भागातील खेळाडूंनी मिळवलेले हे यश इतरांनाही प्रेरक आहे. जिल्ह्यातील क्रीडाक्षेत्राला सर्वतोपरी मदत शासन स्तरावरून करण्यात येत आहे. यापूर्वी राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धेसाठी मॅटची उपलब्धता करून देण्यात आली होती.

शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल सर्व खेळांना प्रोत्साहन देण्याचे काम शासन स्तरावरून होत आहे. जिल्ह्यातील साहसी क्रीडा प्रकारांना पाठबळ देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती मंत्री विखे यांनी दिली. शहरातील क्रीडा संकुलाला निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळे अहिल्यानगर शहरात सर्व सुविधांनी परिपूर्ण असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल तयार होईल, अशी ग्वाही पालकमंत्री विखे यांनी दिली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here