Seema Sajdeh on Life After Divorcing Sohail Khan : सोहेलला घटस्फोट दिल्यानंतर आयुषय कसं बदललं? ‘या’ गोष्टींचा करावा लागला सामना सीमा सजदेहचा खुलासा – Pressalert

0


Seema Sajdeh on Life After Divorcing Sohail Khan : बॉलिवूड अभिनेता सोहेल खाननं 1998 मध्ये सीमा सजदेहसोबत लग्न केलं. पण 2002 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतलाय. आता सीमानं तिच्या घटस्फोटावर वक्तव्य केलं आहे की ती काय विचार करते. इतकंच नाही तर त्या सगळ्याचा तिच्या आयुष्यावर कसा परिणाम झाला. सीमानं सांगितलं होतं की लग्न झाल्यानंतर काहीही विचार न करणं आणि प्रत्येक गोष्टीसाठी समोरच्याला जबाबदार ठरवनं हे खूप सोपं असतं. 

सीमानं सांगितलं की लग्नानंतर काही प्रमाणात ती त्याच्यावर अवलंबून होती आणि घटस्फोटानंतर ती स्वावलंबी व्हावं लागलं. त्यामुळे हेल्थ इंश्योरंसपासून सगळ्या गोष्टी तिला सांभाळाव्या लागल्या. सीमानं ‘द हीलिंग सर्किल’ ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की घटस्फोटा हा तिच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला होता. सीमानं सांगितलं की घटस्फोटाच्या दरम्यान, अनेक गोष्टींवर तिनं स्वत: काम केलं आणि विभक्त झाल्यानंतरही अनेक गोष्टी या स्वत: कराव्या लागतात. त्यात एक सर्जरीनंतर हेल्थ इन्शोरन्सशी संबंधीत सगळ्या गोष्टी देखील होत्या. या सगळ्या अनुभवांनंतर तिला आयुष्यात पुढे जाण्यासाठी आणि आत्मनिर्भर होण्यास शिकवलं. सीमानं सांगितलं की आज तिला वाटतं की आधीच्या तुलनेत ती आता चांगली झाली आहे आणि खासगी लेव्हलवर ती आता सावारली आहे. 

खासगी आयुष्यातील ग्रोथविषयी बोलत सीमा म्हणाली, आजच्या तारखेला ती एकटी डिनरला जाण्यापासून एकटी प्रवास करण्यापर्यंत आणि प्रत्येक छोट्या गोष्टी करताना स्वत: ला कम्पलीट असल्याचं जाणवते. सीमा स्वत: तिची कंपनी एन्जॉय करणं शिकली आहे. खासगी आयुष्याविषयी बोलायचं झालं तर सीमा आता विक्रम आहूजासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. सीमानं तिच्या खासगी आयुष्याला घेऊन अनेक प्लॅटफॉर्मवर वक्तव्य केलं आहे. त्याशिवाय आता तिला वाटतं की वेळेनुसार ती आयुष्यात खूप पुढे गेली आहे. 

हेही वाचा : 100 पेक्षा जास्त चित्रपट, 40 फ्लॉप, 33 तर प्रदर्शित झालेच नाही; ज्याला सगळ्यांनी दिला नकार आज तोच सुपरस्टार

सीमा सोशल मीडियावर सक्रिय आहे. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असल्याचं दिसते. सीमा ही सगळ्यात शेवटी ‘Fabulous Lives vs Bollywood Wives’ या नेटफ्लिक्सवरील शोमध्ये दिसली होती. 




LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here