they celebrate holidays and go away Virender Sehwag blasts on batsmen glenn maxwell and liam livingstone for his poor form ipl 2025 | “ते येतात आणि सुट्ट्या साजऱ्या करून निघून जातात…” ‘या’ परदेशी खेळाडूंच्या फ्लॉप शोनंतर वीरेंद्र सेहवाग संतापला

0


IPL 2025: भारताचा माजी दिग्गज सलामीवीर क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) आयपीएल खेळणाऱ्या परदेशी खेळाडूंवर जोरदार संताप व्यक्त केला आहे. त्याने दोन परदेशी क्रिकेटपटूंवर जोरदार हल्ला चढवला. सेहवाग म्हणतो की ‘ते येतात आणि सुट्टी साजरी करून, मजा करून निघून जातात. ‘ आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सेहवाग नक्की कोणावर एवढा नाराज आहे? तर सेहवागने विशेषतः स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) आणि लियाम लिव्हिंगस्टोन (Liam Livingstone) या दोघांवर टीका केली आहे. या टीकेचे कारण त्या दोघांची  आतापर्यंतची निराशाजनक कामगिरी. मॅक्सवेल हा पंजाब किंग्ज संघाचा भाग आहे आणि लियाम लिव्हिंगस्टोन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळत आहे.

दोघांनाही प्लेइंग-11 मधून वगळले 

आयपीएल 2025 चा 37 वा सामना पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला गेला, ज्यामध्ये मॅक्सवेल आणि लिव्हिंगस्टोन प्लेइंग-११ चा भाग नव्हते. सातत्याने खराब कामगिरीमुळे दोघांनाही प्लेइंग-11 मधून वगळण्यात आले. मॅक्सवेलला पंजाब किंग्जने बेंचवर ठेवले तर लिव्हिंगस्टोनला आरसीबीने प्लेइंग-11 मधून वगळले होते. 

हे ही वाचा: पराभवानंतर धोनीचा राग अनावर… अंपायरलाच सुनावले, ‘हे’ ठरले पराभवाचे कारण? Video Viral

 

सेहवागने केला संताप व्यक्त 

क्रिकबझशी बोलताना सेहवागने ग्लेन मॅक्सवेल आणि लियाम लिव्हिंगस्टोन या दोघांवरही राग व्यक्त केला आहे. तो म्हणाला, ” मला वाटतं मॅक्सवेल आणि लिव्हिंगस्टोनची भूक संपली आहे. ते इथे सुट्टी साजरी करण्यासाठी येतात आणि नंतर सुट्टी साजरी करून निघून जातात. ते येतात, मजा करतात आणि निघून जातात. संघासाठी लढण्याची इच्छा दिसत नाही.” त्याने सांगितले की या हंगामात या दोन्ही खेळाडूंची कामगिरी त्याच्या आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेमुळे येणाऱ्या अपेक्षांनुसार झाली नाही.

हे ही वाचा: 3 चेंडूत 24 धावा… दमदार रेकॉर्ड करणार ‘या’ भारतीय फलंदाजाला तुम्ही ओळखता का?

मॅक्सवेलची बॅट जादू दाखवेना 

आपल्या घातक फलंदाजी आणि सामना जिंकण्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध असलेला ग्लेन मॅक्सवेल या सिजनमध्ये आपली लय शोधण्यासाठी संघर्ष करत आहे. त्याची बॅट जादू दाखवत नाहीये. मॅक्सवेलला पंजाब संघाने 4.2 कोटी रुपयांना खरेदी केले. 

हे ही वाचा: IPL 2025 च्या मधेच कर्णधार पॅट कमिन्सने सोडली SRH ची साथ? पत्नीच्या पोस्टमुळे उडाली खळबळ

लिव्हिंगस्टोनची कामगिरी देखील अपेक्षेपेक्षा कमी

त्याचप्रमाणे, लियाम लिव्हिंगस्टोन  याची देखील कामगिरी देखील अपेक्षेपेक्षा कमी राहिली आहे. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत फक्त एकच अर्धशतक झळकले आहे. लिव्हिंगस्टोनने 7 सामन्यांमध्ये 17.40 च्या सरासरीने 87 धावा केल्या आहेत. आरसीबीने त्याला 8.75 कोटी एवढ्या मोठ्या रुपयांच्या मोठ्या किमतीत खरेदी केले होते.




LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here