राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते झिशान सिद्दिकी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात माहिती मिळताच वांद्रे पोलिस झिशान सिद्दिकी यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. बाबा सिद्दिकी यांच्या ईमेल आयडीवरून धमकीचा मेल प
.
बाबा सिद्दिकी यांची ज्या प्रकारे हत्या करण्यात आली त्या प्रकारे तुझी हत्या करण्यात येईल, असा धमकीचा मेल झिशान सिद्दिकी यांना पाठवण्यात आला आहे. झिशान सिद्दिकी यांनी याबाबत मुंबई पोलिसांना माहिती दिली आहे. जे हाल तुझ्या वडिलांचे केले तेच तुझे करू असा उल्लेख मेलमध्ये करण्यात आला आहे.
तसेच यात डी गॅंगचा उल्लेखही करण्यात आला आहे. झिशान सिद्दिकी यांना गेल्या 2 दिवसांपासून धमकीचे मेल येत असल्याची माहिती आहे. या मेलमध्ये 10 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे. रिमायंडर साठी प्रत्येकी 6 तासांनंतर मेल करणार असल्याचा उल्लेख आहे. दरम्यान, झिशान सिद्दिकी यांचे वडील बाबा सिद्दिकी यांची 12 ऑक्टोबर 2024 रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.