आजच्या तरुणांमध्ये जोखीम घेण्याची क्षमता आहे. त्यांनी मुलभूत गरजांची पूर्ती होण्याची हमी असलेल्या गरिबीपेक्षा धाडस दाखवून समृद्धीचा मार्ग निवडला पाहिजे. योग्य, सकारत्मक मानसिकता आणि प्रशिक्षण याच्या मदतीने २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र होण्यापास
.
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख रामलाल, बालाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. गंगाधर शिरुडे, कुलसचिव डॉ. एस. बी. अग्से, वाणिज्य व व्यवस्थापन विभागाचे अधिष्ठाता डॉ. बिजू पिल्ले, परीक्षा विभागाच्या प्रमुख डॉ. मित्तल मोहिते, लिबरल आर्ट्स विभागाच्या प्राचार्या डॉ. प्रीती जोशी व पुण्यातील विविध शैक्षणिक संस्थांचे उच्चस्तरीय प्रतिनिधी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना संबोधित करताना आर्लेकर म्हणाले की, आपल्याकडे ध्येय असले पाहिजे त्याशिवाय जीवन अर्थहीन होते. प्रत्येक व्यक्तीमध्ये अफाट क्षमता असते. तुम्हाला फक्त ती शोधण्याची आवश्यकता असते. तरुणांनी नवनवीन आव्हाने स्वीकारुन आत्मविश्वासाने बदल घडवणारे नेतृत्व म्हणून उदयास यायला हवे. आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील विकसित भारत साध्य करायचा असेल तर तरुणांनी नवकल्पना व उद्योजकतेची कास धरायला हवी. चौकटी बाहेर विचार करून देशाला सर्व बाबतीत स्वावलंबी करण्यासाठी योगदान द्यावे. त्यासाठी नोकरी या मानसिकतेच्या पलीकडे जावून रोजगार, नोकऱ्या निर्माण करणारा उद्योजक होण्याकडे जास्त लक्ष केंद्रित करावे असे आव्हान आर्लेकर यांनी विद्यार्थ्यांना केले.
आपल्या भाषणात रामलाल यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) खऱ्या अर्थाने अंमलात आणण्यावर भर दिला. त्यांनी वसाहतवादी अवलंबित्वापासून आत्मविश्वासपूर्ण स्वावलंबनाकडे मानसिकता बदलण्याचे व तरुणांना उद्योजकीय विचारसरणी आणि स्टार्टअप परिसंस्था विकसित करण्याचे आवाहन केले.