प्रसिद्ध उद्योगपती बाबा कल्याणी यांनी त्यांची आई सुलोचना हिरेमठ यांच्या समाधीच्या मुद्द्यावर वारंवार न्यायालयात खोटी माहिती देऊन न्यायालयाची फसवणूक केली आहे. सातत्याने आपली भूमिका बदलणाऱ्या आणि खोटी माहिती पुरवणाऱ्या बाबा कल्याणी यांच्यावर न्यायालयान
.
याबाबतचे प्रतिज्ञपत्र गुरुवारी सुगंधा हिरेमठ यांनी न्यायालयात दाखल केले. या मुळे आता कल्याणी कुटुंबातील वाद आणखी विकोपाला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुगंधा यांनी बाबांशी झालेल्या पत्रव्यवहाराचा दाखला देत न्यायालयात सांगितले की, आधी बाबा स्वतःच केशवनगरमधील जमिनीच्या मालकीचा दावा करत होते, परंतु आता कोर्टात ते म्हणतात की ती जमीन कंपनीच्या नावावर आहे. त्यांनी हा बदल कोर्टाच्या दिशाभुलीसाठी मुद्दाम केला, असा आरोप सुगंधा यांनी केला आहे.
फेब्रुवारी १३, २०२५ रोजी झालेल्या पहिल्या सुनावणीत बाबांनी समेट घडवण्यासाठी बैठक घेण्याची तयारी दर्शवली. त्या बैठकीत त्यांनी सांगितले की, काशीच्या जंगमवाडी मठात आईच्या नावाने शिवलिंग स्थापन केलं असून समाधीची गरज नाही. सुगंधा आणि त्यांच्या पतीने काशीला जाऊन पाहणी केली असता, त्या ठिकाणी लाखो शिवलिंग एकत्रित असल्याचं दिसून आलं आणि समाधीसारखं काहीच नव्हतं, यावरून त्यांनी कोर्टात तीव्र नाराजी व्यक्त केली.
बाबा कल्याणी यांनी यावर उत्तर देताना सांगितले की, सर्व भावंडांमध्ये चर्चा अपेक्षित होती, परंतु त्यांचा धाकटा भाऊ उपस्थित राहिला नाही. तसेच त्यांनी हेही स्पष्ट केले की, आईच्या मृत्यूनंतर सर्व विधी धार्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली पार पडले आहेत. पुढील सुनावणी २७ जून रोजी होणार आहे.
सुगंधा यांनी न्यायालयात मांडलेली भूमिका
बाबा कल्याणी यांना त्यांच्या शब्दांचा मोल नाही. ते न्यायालयाच्या पवित्रतेचा अपमान करत आहेत. त्यांनी दिलेली माहिती खोटी आहे आणि न्यायालयाची फसवणूक करण्याचा त्यांचा हेतू आहे. या प्रकारावरून कोर्टाने बाबांविरोधात गंभीर शिक्षेची कारवाई करावी, अशी मागणी सुगंधा हिरेमठ यांनी केली.