उल्लू ॲपवर ‘हाऊस अरेस्ट’ नामक शोवरून नवा वाद सुरू झाला आहे. या शोवर बंदी घालण्याची मागणीने जोर धरला आहे. शोमध्ये अश्लीलता प्रसारित केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी सोमवारी अभिनेता एजाज खानला नोटीस बजावली. या नोटिशीत खान आणि ज्या उल्लू ॲपवर हा शो प्रसारि
.
या शोच्या विरोधात महिला आयोगाने देखील दाखल घेत कारवाई करण्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर म्हणाल्या की, शोमध्ये स्पर्धकांकडून विचारल्या जाणाऱ्या अश्लील प्रश्नांबद्दल अनेक महिलांनी तक्रार केली आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या डीजीपींना कारवाई करण्याचे पत्र लिहिले आहे आणि या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती चाकणकर यांनी दिली आहे.
रूपाली चाकणकर म्हणाल्या, या शोबद्दल आम्हाला अनेक तक्रारी आल्या आहेत ज्यात असे म्हटले आहे की शोमधील स्पर्धकांना अश्लील प्रश्न विचारले जातात आणि अशाच प्रकारच्या कृती करण्यास सांगितले जाते. आम्ही कारवाईसाठी डीजीपी कार्यालयाला पत्र लिहिले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या शोवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अश्लीलतेला मोकळं रान देणं थांबवा! एजाज खानच्या ‘हाऊस अरेस्ट’ शो वर बंदी घाला, अशी मागणी भाजपच्या विधानपरिषदेच्या आमदार चित्रा वाघ यांनी केली आहे. चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही मागणी केली आहे.