3 People Died in Three Different Accidents in Pune | Pune Accident | Pune Crime | Accident News | पुण्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी अपघात: मांजरी, येरवडा आणि कात्रज परिसरात तीन जणांचा मृत्यू – Pune News

0



वाहतुकीचे नियमांचे योग्यप्रकारे पालन न करता निष्काळजीपणा करुन वाहने चालवल्याने अपघात घडल्याचे तीन प्रकार पुण्यातील कात्रज, येरवडा व मांजरी परिसरात घडले आहे. सदर तीन ठिकाणी घडलेल्या वेगवेगळया तीन घटनांमध्ये तीन जणांचा दुर्देवी मृत्यू झाल्याचा प्रकार घ

.

हडपसर परिसरातील मांजरी भागात झेड कॉर्नर समोर तुपे कॉर्नर खाऊ गल्ली समोरील रस्त्यावरुन ब्रम्हशंकर शिवप्रताप पांडे (वय- ३९,रा.केशवनगर,पुणे) हे त्यांची पत्नी रेणु ब्रम्हशंकर शिवप्रताप पांडे (वय- ३८) हिच्यासोबत जात होते. त्यावेळी काँक्रीट मिक्सर (एमएच १२ एक्स एम ८१४१) वरील चालकाने त्याचे ताब्यातील वाहन हे रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन निष्काळजीपणे, हयगयीने भरधाव वेगात चालवून पांडे यांच्या दुचाकीस जोरात धडक दिली. यामध्ये रेणु पांडे या काँक्रीट मिक्सर गाडीखाली येऊन त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर सदर वाहन चालक पसार झाला असून त्याचा शोध हडपसर पोलिस घेत आहे. तर, दुसऱ्या घटनेत येरवड्यातील शास्त्रीनगर चौकात डॉन बॉस्को स्कुल समोरील खाऊ गल्ली समोरुन निखिल खेडकर (वय- ३०) हा चारचाकी कार (एमएच १२ एम झेड १९०४) चालक याने त्याचे ताब्यातील वाहन हयगयीने, निष्काळजीपणे चालवून जोरात वाहन धडकून स्वत:च्या मृत्यूस कारणीभूत झाला आहे. याप्रकरणी खेडकर विरोधात पोलिस शिपाई शामराव उत्तम ससाणे (२५) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

कात्रज बायपास रस्त्यावर वंडर सिटी समोर कात्रज कडून नवले ब्रीजकडे जाणारे कात्रज बायपास रस्त्यावरुन प्रियांका सूर्यकांत राऊत (वय- ३३,रा. वाघजाईनगर, आंबेगाव खुर्द,पुणे) या त्यांची आई लहुबाई अश्रुबा वाघमारे यांच्या सोबत दुचाकीवर (एमएच १२ एसपी १२६९) जात होत्या. त्यावेळी टाटा चारचाकी कार (एमएच १६ सीसी ४३४५) वरील चालकाने भरधाव वेगात वाहन चालवून राऊत यांचे दुचाकीस पाठीमागून जोरात धडक दिली. कारचालकाने दुचाकीचे नुकसान करुन तक्रारदार यांना गंभीर जखमी केले. तर त्यांची आई लहुबाई वाघमारे यांना देखील गंभीर जखमी करुन त्यांचे मृत्यूस कारणीभूत झाला आहे. अपघातानंतर कार चालक पसार झाला असून त्याचा शोध पोलिस घेत आहे. याप्रकरणी आंबेगाव पोलिस पुढील तपास करत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here