राज्यातील बारावीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यावर्षीही मुलींनी पुन्हा एकदा बाजी मारली. उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी पेढे वाटून कुटुंबीयांसोबत आपला आनंद साजरा केला. सोशल मीडियावरही यशाच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. मात्र, या आनंदाच्या पार
.
पहिली घटना जळगाव जिल्ह्यातील ममूराबाद गावातील आहे. आज बारावीच्या परीक्षचे निकाल जाहीर झाला. मात्र, यामध्ये अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याच्या नैराश्यातून ऋषिकेश दिनेशचंद्र पाटील या विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
दुसरी धक्कादायक घटना यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस शहरात घडली. लकी सुनील चव्हाण असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. नीट परीक्षा काल पार पडली असून, लकी सुनील चव्हाण (वय १९) या विद्यार्थ्याने नीटचा पेपर कठीण गेल्याने आणि आपण अपेक्षित निकाल मिळवू शकणार नाही, या भीतीने टोकाचे पाऊल उचलले. त्याने पहाटे तीन वाजताच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. लकीने नांदेडमध्ये कोचिंग क्लासेस करत नीट परीक्षेसाठी तयारी केली होती. त्याचे वडील शिक्षक असून, फुलउमरी (जि. वाशिम) येथे कार्यरत आहेत. काल झालेला पेपर ठीक न गेल्याने तो नाराज होता, असे त्याचे काका मंगल चव्हाण यांनी दिग्रस पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
हे ही वाचा…
बारावी परीक्षेचा निकाल जाहीर:91.88% विद्यार्थी उत्तीर्ण, पुन्हा मुलींची बाजी; कोकणचा सर्वाधिक अव्वल, लातूरचा सर्वात कमी निकाल
एचएससी बोर्डाने फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर झाला आहे. यंदा तब्बल 91.88% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी सांगितले की, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या 9 विभागीय मंडळांमार्फत झालेल्या या परीक्षेचा निकाल विषयनिहाय गुणांसह 9 विविध संकेतस्थळांवर उपलब्ध होईल. पूर्ण बातमी वाचा…
संतोष देशमुखांच्या लेकीचे घवघवीत यश:बारावी बोर्डाच्या परीक्षेत 85.33 टक्के, कौतुकाची थाप मारायला वडील नसल्याची व्यक्त केली खंत
बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे देशमुख कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले होते. त्यात पेटलेले राजकारण आणि वाल्मीक कराड सारखा आरोपी समोर येणे, या सगळ्या घडामोडी घडत असताना संतोष देशमुख यांची लेक वैभवी देशमुखचे बारावीचे महत्त्वाचे वर्ष सुरू होते. अशा परिस्थितीत कष्टाने अभ्यास करत तिने चांगले यश मिळवले आहे. पूर्ण बातमी वाचा…