[ad_1]
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन महिन्यांत 25 किलो वजन कमी केले आहे. डॉ. जयश्री तोडकर यांनी सांगितला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अतिशय प्रामाणिक व्यक्तिमत्व आहे. कारण त्यांनी दिलेला डाएट प्लान 100 पैकी 80 वेळा तंतोतंत पाळला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जेव्हा उपचार सुरू केले तेव्हा त्यांचे वजन 122 किलो होते. आता त्यांचे वजन 104 किलो केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी वजन कमी करण्यासाठी मेटाबॉलिक उपचार घेतले. मेटाबॉलिक म्हणजे काय? डॉ. जयश्री तोडकरांनी सांगितले त्यांचे डाएट प्लान.
मेटाबॉलिक उपचार म्हणजे काय?
- चयापचय उपचारांमध्ये, औषधांच्या मदतीने तसेच आहाराच्या मदतीने वजन कमी केले जाते.
- यामध्ये अशी औषधे दिली जातात जी चयापचय वाढवतात.
- यासोबतच, त्या व्यक्तीच्या शरीराच्या प्रकारानुसार आहार योजना बनवली जाते.
- आहार आणि औषधांसोबतच, आठवड्यातून किमान दोन ते तीन तास व्यायाम देखील केला पाहिजे.
कुणाकडून घेतली वजन कमी करण्याची प्रेरणा
मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत 25 किलो वजन कमी करुन ते 104 किलोवर आणले आहे. पण यानंतर त्यांना वजन 88-90 पर्यंत आणण्याचे लक्ष्य आहे. मुख्यमंत्र्यांनी वजन कमी करण्याची प्रेरणा ही पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडून घेतली आहे. देवेंद्र यांनी याआधीही वजन कमी केलं आहे. पण कामाचा व्याप आणि अनियमित वेळापत्रक हे त्यांना वजन वाढीला कारणीभूत ठरले आहे. पण पत्नीने जेव्हा 5 ते 6 किलो वजन कमी केलं तव्हा फडणवीसांना प्रेरणा मिळाली.
असा होता डाएट प्लान
डॉ. तोडकर यांच्या माहितीनुसार, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अतिशय प्रामाणिक व्यक्तिमत्त्व आहे. ते आपल्या डाएट प्लानचा काटेकोरपणे पालन करतात. त्यांच्या डाएटचं काटेकोरपणे पालन करतात. फडणवीस दिवसातून एकदा चहा पितात. त्यांच्या शाकाहारी जेवणात पनीर तर मांसाहारी जेवणात मासे, चिकनचा समावेश आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांना डाएट चार्टप्रमाणेच बटर आणि तूप सोबतच जंक फूडला परवानगी नाही.
शारीरिक व्यायामाला अतिशय महत्त्वाचं
डाएट प्लानसोबतच वजन कमी करण्यासाठी फडणवीसांनी मिकी मेहता यांची मदत घेतली. मुख्यमंत्र्यांना आठवड्यातून दोन तास श्वासोच्छवासाचा व्यायाम शिकवला जातो. “फडणवीस यांना दिवसातून जेमतेम चार ते पाच तासांची झोप मिळते. श्वासोच्छवासाच्या व्यायामाने अपुऱ्या झोपेचा शीण भरुन काढला निघतो. वर्षअखेरीस मुख्यमंत्री त्यांचं लक्ष्य पार करतील,” असं मिकी मेहता यांनी सांगितलं.
(Disclaimer – वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)
[ad_2]