Pregnancy Tips When you should take a pregnancy Test after IVF Marathi News | IVF केल्यानंतर किती दिवसांनी करावी प्रेग्नेंन्सी टेस्ट? 90% लोकांना ‘या’ दिवशी आला पॉझिटिव्ह रिझल्ट

0

[ad_1]

Pregnancy Test After IVF: वर्षानुवर्षे मूल होण्यासाठी अनेक जोडपी संघर्ष करत असतात. अशावेळी आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा अवलंब केला जातो. IVF केल्यानंतर पहिला प्रश्न येतो की,आता गर्भधारणा चाचणी कधी करावी लागेल? जरी उपचारादरम्यान त्यांना संपूर्ण माहिती दिली जाते, तरीही कधीकधी ते घाईघाईने किंवा घाबरून हे विसरतात आणि म्हणूनच या जोडप्यांचा गोंधळ दूर करण्यासाठी किती दिवसांनी चाचणी करावी याबद्दल समजून घेऊया. जेणेकरून तुम्हाला प्रेग्नेंन्सीबाबत Good News मिळेल.  कधीकधी घाईमुळे, चाचणी नकारात्मक दिसू शकते, तर महिला प्रत्यक्षात गर्भवती असते. अशा परिस्थितीत, आयव्हीएफ नंतर गर्भधारणा चाचणीसाठी योग्य वेळ कोणती आहे हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. 99 टक्के लोकांना याबाबत आतापर्यंत सकारात्मक रिपोर्ट मिळाला आहे. 

आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा अवलंब करणाऱ्या जोडप्यांनी IVF ट्रिटमेंट १० ते १२ दिवसांनी गर्भधारणा चाचणी करावी, जेणेकरून निकाल अचूक आणि विश्वासार्ह असेल. तर, नैसर्गिक गर्भधारणेमध्ये, महिलांना मासिक पाळी चुकल्यानंतर किंवा इतर कोणतेही शारीरिक बदल दिसल्यानंतरच गर्भधारणेबद्दल कळते.

स्टेप १ 

आयव्हीएफ प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी, गर्भधारणेचे नियोजन करणाऱ्या महिलेला काही हार्मोनल इंजेक्शन दिले जातात. हे हार्मोन्स महिलांच्या अंडाशयात अधिक अंडी (फिमेल एग) तयार करण्यास मदत करतात. या प्रक्रियेला काही दिवस लागतात.

स्टेप 2

अंडी पूर्णपणे विकसित झाल्यावर, एका लहान शस्त्रक्रियेच्या मदतीने ती गोळा केली जातात.

पायरी ३

नंतर, गोळा केलेले अंडी नमुने वडिलांच्या शुक्राणूंसह गर्भाधानासाठी ठेवले जातात. गर्भाधानानंतर, अंडी काही दिवसांसाठी देखरेख आणि निरीक्षण केली जातात.

स्टेप 4

अंडी फलित केल्यानंतर, गर्भ तयार होतो. हे गर्भ स्त्रीच्या गर्भाशयात (एम्ब्रियो इम्प्लांटेशन) रोपण केले जातात.

किती दिवसांनी गर्भधारणा चाचणी करावी?

आयव्हीएफ प्रक्रियेत, गर्भाशयात गर्भ रोपण केल्यानंतर, सुमारे १०-१४ दिवसांनी गर्भधारणा चाचणी करता येते. यावेळी गर्भधारणा चाचणी करून, गर्भधारणा चाचणीचे निकाल अचूक असल्याचे दाखवता येते.

(Disclaimer – वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)  



[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here