‘खून का बदला खून’ आणि ‘ईट का जबाब पत्थर सें’ ही देशवासीयांची अपेक्षा होती. ती अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केली आहे. पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले आहे. याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मा
.
पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात 25 भारतीय पर्यटकांमध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचा देखील समावेश होता. त्यामुळे या हल्ल्याचा बदला घेण्याची मागणी महाराष्ट्रातून जोर धरत होती. त्यातच आता भारतीय सैन्याच्या वतीने ‘ऑपरेशन सिंदूर’ पूर्ण करण्यात आले आहे. त्याबद्दल आता भारतीय सैन्याचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रातील नागरिकांनी अभिनंदन केले आहे. या संदर्भात एकनाथ शिंदे यांनी देखील न्याय मिळाला असल्याची भावना व्यक्त केली आहे.
सर्व देशवासीयांची छाती गर्वाने फुलली
या संदर्भात एकनाथ शिंदे म्हणाले की, ऑपरेशनच्या सिंदूरच्या माध्यमातून जी कारवाई करण्यात आली, त्याचे मी अभिनंदन करतो. यासाठी देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन आणि आभार व्यक्त करत असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये जे नागरिक पर्यटकांसाठी गेले होते, त्या महिला आणि मुलांसमोर त्यांच्या कुटुंबातील प्रमुखाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली. ही घटना मानवतेला कलंक असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
आतंकवादी आणि पाकिस्तानाला याचा ‘ईट का जबाब पत्थर सें’ देण्याची देशवासीयांची इच्छा आणि अपेक्षा होती. ती अपेक्षा पूर्ण झाली असून त्यांना न्याय मिळाला आहे. यामुळे सर्व देशवासीयांची छाती गर्वाने फुलली असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन करत असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. ते पाकिस्तानला सोडणार नाही, खून का बदला खून ने देत आहेत. संपूर्ण देश त्यांच्यासोबत उभा असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.