पहलगाममध्ये कुटुंबाच्या प्रमुखाला गमावलेल्या नातेवाइकांनी भारतीय सैन्याच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर समाधान व्यक्त केले आहे. सर्वांनीच ‘धन्यवाद मोदी’जी अशा शब्दात आपली प्रतिक्रिया दिली आहे. या सर्व शहीद पर्यटकांच्या विधवा आणि नातेवाइकांनी प्रतिक्रिया व्य
.
भारतीय सैन्यांनी ऑपरेशन सिंदूर च्या माध्यमातून भारतीय महिलांचे कुंकू पूसणाऱ्या दहशतवाद्यांना चांगला धडा शिकवला आहे. या घटनेत मृत झालेल्या भारतीय नागरिकांच्या हत्येचा बदला एका अर्थाने भारतीय सैनिकांनी घेतला आहे. या हल्ल्यात महाराष्ट्रातील देखील सहा नागरिकांचा मृत्यू झाला होता. या सर्व मृत पर्यटकांच्या कुटुंबीयांनी बदला पूर्ण झाला असल्याची भावना व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार देखील मानले आहे. पाकिस्तानला धडा शिकवा आणि दहशतवाद दूर करा, अशी मागणी या कुटुंबाकडून करण्यात आली होती.
सिंदूर असे नाव देऊन त्यांनी महिलांचा सन्मान राखला – संगीता एकबोटे
या हल्ल्यात पती गमावलेल्या संगीता एकबोटे यांनी या ऑपरेशन बद्दल भारतीय सैनिकांचे आभार मानले आहेत. या ऑपरेशनला सिंदूर असे नाव देऊन त्यांनी महिलांचा सन्मान राखला असल्याचे यावेळी त्या म्हणाल्या. या हल्ल्याला आता पंधरा दिवस झाले आहेत. मात्र अद्याप एकही दिवस असा गेला नाही की, मला त्यांची आठवण आली नाही. आजही तो दिवस आठवून आम्हाला अश्रू अनावर होतात. अशी प्रतिक्रिया संगीता एकबोटे यांनी दिली आहे.
आमच्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेतला – शुभम द्विवेदी यांच्या पत्नी
ऑपरेशन सिंदूर राबवल्याबद्दल शुभम द्विवेदी यांच्या पत्नीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आभार मानले आहे. माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला आहे, याचे मला समाधान वाटत असल्याचे देखील त्या म्हणाल्या. मी त्यांना काहीही सांगायला खूप लहान आहे. मात्र, आमच्या कुटुंबाचा त्यांच्यावर विश्वास होता. त्यांनी आमच्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेतला, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार – आसावरी जगदाळे
संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरी जगदाळे म्हणाल्या की, “ऑपरेशनचे नाव ऐकून आम्ही खूप रडलो. दहशतवाद्यांनी मारलेल्यांना ही खरी श्रद्धांजली आणि न्याय आहे,” पहलगाम दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरी जगदाळे म्हणाल्या की, या बद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानते.
मला झोप का येत नव्हती? – हर्षल संजय लेले
या दहशतवादी हल्ल्यात काश्मीरमध्ये शहीद झालेले संजय लेले यांचा मुलगा हर्षल संजय लेले म्हणाला की, “काल रात्री २:०० ते २:३० च्या सुमारास माझ्या मित्राने मला मेसेज पाठवला तेव्हा मी हे पाहिले. त्यावेळी मी योगायोगाने जागा होतो, पण मला झोप का येत नव्हती हे मला माहित नाही, पण ते चांगले झाले, कारण मला घडणाऱ्या घटना लाइव्ह पाहता आल्या.”