Mock Drill in India Will KKR vs CSK clash in IPL 2025 at Kolkata Eden Gardens get affected All you need to know

0


Mock Drill Impact KKR vs CSK? भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा वाद शिगेला पोहचलेला असतानाच आज देशभरामध्ये युद्धसरावाची तयारी केली जाणार आहे. गृहमंत्रालयाने 7 मे रोजी देशभरात मॉक ड्रील म्हणजेच युद्ध सराव घेण्याचे निर्देश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज जोरदार तयारी करण्यात आली आहे. 1971 साली झालेल्या आपत्कालीन युद्धसरावानंतर भारतात पहिल्यांदाच असा सराव केला जाणार आहे. सायरन वाजल्यानंतर स्वत:च्या संरक्षणासाठी सुरक्षित ठिकाणी जावे असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच ब्लॅक आऊट करण्यासाठी दिवे बंद करण्याची आणि अडकलेल्यांची सुटका करण्याचा सरावही केला जात आहे. सायरन वाजल्यानंतर घरातील दिवे बंद करावेत आणि सुरक्षित स्थळी जावे असं सांगण्यात आलं आहे. 

आयपीएलवर परिणाम होणार

या साऱ्या तयारीदरम्यान भारतीय क्रिकेट चाहत्यांना इंडियन प्रिमिअर लीगच्या आजच्या सामन्याचं काय होणार असा प्रश्न पडला आहे. आज चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्सदरम्यान कोलकात्यामधील ईडन गार्डन्स येथे आयपीएलचा 57 वा सामना होणार आहे. या सामन्यादरम्यानही लाईट्स बंद केल्या जाणार का? खेळाडू मैदानात असताना ईडन गार्डन्सवरील बत्ती गुल होणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. हा सामना कोलकात्यासाठी फार महत्त्वाचा आहे. त्यामुळेच हा सामना सुरु असतानाच मैदानावरील सर्व दिवे घालवले जाणार का? या दोन्ही संघांना याचा फटका बसणार का? यासंदर्भातील चर्चा सुरु आहे.

वेगवेगळ्या राज्यांनी जाहीर केला वेळ

देशातील वेगवगेळ्या राज्यांनी मॉक ड्रीलचा वेळ जाहीर केला आहे. पश्चिम बंगाल सरकारने मात्र कोणताही वेळ जाहीर केलेला नाही. सामान्यपणे सर्वच राज्यांमध्ये सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास मॉक ड्रील केलं जाणार आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या यादीमध्ये ग्रेटर कोलकाता जिल्हा हा पश्चिम बंगालमधील ज्या 25 जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रील होणार आहे त्यामध्ये समावेश आहे. 

ईडन गार्डन्स असलेल्या भागात दिवे घालवले जाणार?

ईडन गार्डन्स ज्या भागात आहे त्या ठिकाणी सकाळी साडेअकराच्या सुमारास मॉक ड्रील पार पडणार आहे. तर सामना सायंकाळी साडेसात वाजता आहे. मॉक ड्रील दुपारी चार वाजता पार पडलं तरी सामना सुरु होण्याआधी ते संपेल. त्यामुळेच बीसीसीआय, केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा बंगाल क्रिकेट असोसिएशनकडूनही कोणतीही पूर्व सूचना देण्यात आलेली नाही. त्यामुळेच कोलकाता आणि चेन्नईच्या सामन्यावर मॉक ड्रीलचा परिणाम होणार नाही, हे स्पष्ट आहे. म्हणजेच हा सामना सुरु असतानाच दिवे बंद होणार नाहीत. तसेच मैदानातील प्रेक्षकांना अंधरात रहावं लागणार नाही. 

गावस्कर म्हणतात, ‘परिणाम झाला तरी…’

मात्र भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी ‘स्पोर्ट्स टुडे’शी बोलताना, “आयपीएलवर मॉक ड्रीलचा काही परिणाम होईल असं वाटत नाही. जरी शहरामध्ये त्यावेळेत दिवे बंद करण्याचा सराव झाला तरी काही काळ सामन्यावर परिणाम होऊ शकतो,” असं म्हटलं आहे.




LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here