Shahid Afridi Troll: जम्मू काश्मिरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने दहशतवादाविरोधात मोठी कारवाई केलीय. भारताच्या तिन्ही सैन्याने एकत्र मिळून ऑपरेशन करत पाकिस्तानातील 9 दहशतवादी ठिकाणांवर एअरस्ट्राइक करत लक्ष्य केलंय. रिपोर्टनुसार, या हल्ल्यात 90 दहशतवाद्यांचा खात्मा झालाय. भारतीय सैन्याने याला ऑपरेशन सिंदूर असे नाव दिलंय.
ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्याचा गौरव केला जातोय. दुसरीकडे गेल्या काही दिवसात पाकिस्तानच्या बाजून बोलणाऱ्यांना ऑपरेशन सिंदूरच्या पोस्ट दाखवून ट्रोल केलं जातय. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपट्टू शाहीद आफ्रिदीदेखील यात आहे.
काय म्हणाला होता आफ्रीदी?
काही दिवसांपूर्वीच, समा टीव्हीवरील कार्यक्रमात काश्मीरमध्ये भारताच्या लष्करी उपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने शाहीद आफ्रिदी व्हायरल झाला होता.’8 लाखांची फौज असताना हे झालं, याचा अर्थ तुम्ही नालायक आहात. बिनाकामाचे असून तुम्ही नागरिकांना सुरक्षा देऊ शकला नाहीत.’, अशी प्रतिक्रिया शाहीद आफ्रीदीने दिली होती.
‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय सैन्याने सीमोल्लंघन न करता दहशतवाद्यांच्या घरात घुसून त्यांना ठार केलं. यानंतर इंटरनेटवर खळबळ भारतीय यूजर्सनी आफ्रिदीला मीम्स टॅग करत ट्रोल केलंय. ‘आ गया स्वाद?’ असं एकाने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.दुसऱ्या एका युजरने ‘शाहीद आफ्रीदी कुठे लपलायस? असा प्रश्न विचारला.
भारतीय क्रिकेटपटूंच्या पोस्ट
India takes a stand against terrorism. भारत माता की जय!
— Shikhar Dhawan (@SDhawan25) May 7, 2025
ऑपरेशन सिंदू सदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी सर्वसामान्य नेटकऱ्यांसोबतच क्रिकेट क्षेत्रातील मंडळीही मागे हटली नाहीत. माजी आणि सध्याचे दोन्ही प्रमुख भारतीय क्रिकेटपटूंनी भारतीय सशस्त्र दलांना पाठिंबा देणाऱ्या पोस्ट सोशल मीडियात केल्या.
गंभीरची पोस्ट
भारताचा माजी सलामीवीर आणि सध्याचे खासदार गौतम गंभीर त्याच्या देशभक्तीपर वक्तव्यासाठी ओळखला जातो. त्याने भारतीय सैनिकांचा एक फोटो शेअर केला आणि कॅप्शन दिले, ‘जय हिंद! न्याय मिळाला. #ऑपरेशनसिंदूर; गंभीरची पोस्ट काही मिनिटांत खूपच व्हायरल झाली. यूजर्सनी सशस्त्र दलांच्या पाठीशी नेहमीच उभे राहिल्याबद्दल त्याचे कौतुक केले. आकाश चोप्रा, प्रज्ञान ओझा, वरुण चक्रवर्ती यांनीदेखील सोशल मीडिया पोस्टमधून सैन्याला सलाम केला. क्रिकेट विश्लेषक आणि माजी सलामीवीर आकाश चोप्रानेही याच भावना व्यक्त केल्या. ‘जेव्हा शत्रू हल्ला करतो तेव्हा भारत अधिक जोरदार प्रहार करतो. आपल्या सैन्याचा अभिमान आहे.’, असे आकाश चोप्राने म्हटलंय. प्रज्ञान ओझाने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय, टहा सूड नाही. हा न्याय आहे. हे शक्य करणाऱ्या प्रत्येक सैनिकाला सलाम.’ दरम्यान केकेआरचा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर ‘रिस्पेक्ट’ या कॅप्शनसह भारतीय लष्कराचा अधिकृत ‘ऑपरेशन सिंदूर’ फोटो पोस्ट केलाय.
साऱ्यांचा राग निघाला आफ्रिदीवर
Shahid Afridi Faces Troll Tsunami pic.twitter.com/bAFB2zfT9Y
— Akash Kharade (@cricaakash) May 7, 2025
एकीकडे ऑपरेशन सिंदूर ट्रेण्ड करत असताना दुसरीकडे यूजर्स शाहिद आफ्रिदीला ट्रोल करताना दिसले. दहशतवाद्यांनी केलेल्या दुष्कृत्याचे राजकारण करून भारताच्या संरक्षण दलांना लक्ष्य करण्याची पोस्ट त्याने केली होती. त्यामुळे आफ्रिदीच्या नैतिक दृष्टिकोनावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अनेकांनी शिखर धवन आणि इरफान पठाण सारख्या माजी भारतीय क्रिकेटपटूंनाही आपल्या पोस्टमध्ये टॅग केले. कारण यापूर्वी आफ्रिदीच्या चिथावणीखोर वक्तव्यांना या खेळाडुंनी त्याच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले होते. धवन यावेळी गप्प असला तरी त्याने एकदा आफ्रिदीला ‘आधी स्वतःचे अंगण स्वच्छ करा’ असे सांगितले होते.