ट्रिस्टन स्टब्सच्या विकेटवरून गोंधळ, मुंबईला जिंकवण्यासाठी अंपायरने दिल्ली कॅपिटल्ससोबत केली चीटिंग?

0


IPL 2025 : आयपीएल 2025 मध्ये बुधवारी वानखेडे स्टेडियमवर पार पडलेला  63 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Mumbai Indians VS Delhi Capitals) यांच्यात पार पडला. हा सामना जिंकणं दिल्ली कॅपिटल्ससाठी अत्यंत महत्वाचं होतं , मात्र मुंबई इंडियन्सने 59 धावांनी त्यांच्यावर विजय मिळवला. या पराभवानंतर दिल्लीचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेला. दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, गोलंदाजीमध्ये शेवटच्या  2 ओव्हर सोडल्या तर त्यांचं प्रदर्शन चांगलं राहीलं. 

मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करून दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी 181 धावांचे आव्हान दिलं. मुंबईकडून विजयासाठी हे टार्गेट मिळाल्यावर दिल्ली कॅपिटल्स सुरुवातीपासूनच दबावात होते. दिल्ली कॅपिटल्सची टॉप ऑर्डर मुंबईने स्वस्तात माघारी धाडली. परंतु मिडल ऑर्डरमध्ये ट्रिस्टन स्टब्स सारखे ऑल राउंडर होते त्यामुळे संघाला त्यांच्याकडून चांगल्या धावांची अपेक्षा होती. परंतु खराब अंपायरिंगमुळे तो लवकरच आउट झाला. 

हेही वाचा : Points Table मध्ये टॉपवर फिनिश करू शकते मुंबई इंडियन्स, कसं आहे समीकरण?

ट्रिस्टन स्टब्सच्या विकेटवरून गोंधळ : 

दिल्ली कॅपिटल्सच्या विरुद्ध जसप्रीत बुमराह पूर्णपणे त्याच्या लयीत होता. दिल्लीचे फलंदाज सुद्धा बुमराहच्या गोलंदाजी समोर आक्रमक फलंदाजी करायला घाबरत होते. जसप्रीत बुमराहने मुंबई इंडियन्ससाठी 3.2 ओव्हरमध्ये 12 धावा देऊन 3 विकेट घेतले. या 3 पैकी एक विकेट ट्रिस्टन स्टब्सची होती. परंतु त्याच्या विकेटवरून गोंधळ निर्माण झाला, ज्यामुळे सध्या त्याच्या विकेटवरून दिल्लीचे चाहते अंपायरला दोषी ठरवत आहेत. 10 व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर बुमराहने ट्रिस्टन स्टब्सला आपल्या वेगवान गोलंदाजीने चकवले.  बुमराहने टाकलेला बॉल हा ट्रिस्टन स्टब्सच्या बॅटच्या अगदी जवळून जात पॅडवर लागला. 

बुमराह सोबत मुंबई इंडियन्सच्या संपूर्ण संघाच्या एलबीडब्ल्यूसाठी अपील केली, आणि अंपायरने देखील त्याला आउट करार दिला. स्टब्सला असं वाटलं की बॉल त्याच्या बॅटच्या किनाऱ्याला लागून गेला. परंतु थर्ड अंपायरने सांगितले की बॉल बॅटला लागला नाही. अशा परिस्थितीत बॉलचा परिणाम दिसून आला. बुमराहचा हा बॉल ऑफ स्टंपवर पिच करत लेग स्टंपकडे जात होता, परंतु बॉलचाइम्पॅक्ट विकेटवर हिट करत होता. अशातच अंपायर कॉलमुळे स्टब्सला आउट करण्यात आले. परंतू गोंधळ या गोष्टीवरून झाला की जर बॉलच्या इम्पॅक्टला पाहिले जात होते तेव्हा त्याची लाईन विकेटच्या बाहेर असल्याचे दिसून आले यावरून वाद झाला. याचमुळे सोशल मीडियावर अंपायरने दिल्ली कॅपिटल्स सोबत चीटिंग केली असं म्हटलं जात आहे. कारण ट्रिस्टन स्टब्सची विकेट दिल्लीच्या इनिंगमधील मोठा झटका होता. 

 




LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here